🌟मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत पोलिस पाटील पदांच्या भर्तीला स्थगिती द्या....!


🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे अखिल भारतीय छावा मराठा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी🌟 

महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत असल्यामुळे शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेपर्यंत पोलीस पाटील या पदांसाठी होणारी भरती स्थगित करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष गजानन सवराते यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सध्या मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून मागणी सादर करण्यात आलेली आहे त्यामुळे जर पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवली तर मराठा समाजातील पात्र उमेदवारांचे न भरुन येणारे नुकसान होईल त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना या संधीपासून मुकावे लागेल त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस पाटील भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरच तलाठी भरती प्रक्रिया चालू करावी असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले असून प्रशासनाने तलाठी भरती प्रक्रिया स्थगित केली नाही तर नाईलाजास्तव मराठा समाजाला आंदोलन छेडावे लागेल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी असेही  अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गोविंदराव मुळे,अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष छत्रपती शिंदे,अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष गजानन सवराते,अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे युवा उपजिल्हाध्यक्ष नागनाथ गुंडाळे,अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल सुर्यवंशी,अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष रवी जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या