🌟भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव दिवटे यांनी पुरस्कार प्राप्त संपादक प्रसाद पौळ यांचा केला सत्कार🌟
पुर्णा : पुर्णा येथे शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने दि.०६ जानेवारी २०२४ रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील आठ अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांसह शहरातील पत्रकार तसेच ग्रामीण भागातील संपादकांच्या संत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालम येथील रुरल एक्स्प्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांना 'जनहीवादी पत्रकाराच्या लेखणीचा सन्मान' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
रुरल एक्स्प्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आज बुधवार दि.१० जानेवारी रोजी पालम शहरातील गिरीजा मेडिकल त्यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव दिवटे,लिंबाजी अण्णा टोले आदींची उपस्थिती होती....
0 टिप्पण्या