🌟परभणी जिल्ह्यात सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी दूर करुन सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण करावे....!


 🌟राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे यांचे निर्देश🌟 

परभणी (दि.27 जानेवारी) :  जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी दूर करुन सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यावेळी दिल्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण व विविध शासकीय योजना, धरण, प्रकल्प, सिलिंग कायद्याअंतर्गत झालेले जमीन अधिग्रहण याबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी डॉ. काळे हे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, दत्तु शेवाळे, तहसीलदार यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होते. 



सर्वेक्षण करतांना प्रगणक आणि पर्यवेक्षकाना  माहिती संकलित करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी  तात्काळ दूर करून सर्व्हेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे असे आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर व सेलू तालुक्यातील काही गावांची नावे ॲपमध्ये दिसत नसल्यामुळे या ठिकाणचे सर्वे थांबला असून, या गावांतील तांत्रिक समस्या प्रशासनाने तात्काळ सोडवून सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण करावे अशा सूचना ही राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी दिल्या. खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाबाबत अचूक माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात यावी,  यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ग्रामपातळी पासून केले जाणारे सर्वेक्षण हे अचूक व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केले जात आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि प्रगणक चांगले काम करीत असल्याचा गौरव राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी यावेळी केला.

जिल्हा प्रशासनामार्फत परभणी जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे काम सुरु असून यासाठी  211  पर्यवेक्षक, 3 हजार 232 प्रगणक व इतर मनुष्यबळ कार्यरत आहेत. काही तांत्रिक अडचणी जशा समोर येत आहेत, त्या तात्काळ दूरही केल्या जात आहेत. ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्याचा एकत्रित विचार करुन सर्व प्रश्न व सॉफ्टवेरमधील त्रुटी दूर केल्या जात असल्याचे प्रा.डॉ.गोविंद काळे यांनी यावेळी सांगितले भूसंपादनाचे सर्व रेकॉर्ड तसेच एमआरईजीएसमध्ये श्रमाची कामे करणाऱ्यांची माहिती तपासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांची माहिती संकलीत करुन राज्य मागासवर्ग आयोगाला तात्काळ सादर करावी. तसेच नुकत्याच निघालेल्या अधिसूचनेनुसार ज्या कुटुंबाकडे वंशावंळी आहे. त्या वंशावळीच्या अनुषंगाने विशेष शिबीरे घेऊन जास्तीत जास्त जात प्रमाणपत्राचे वितरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी व झालेल्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली...... 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या