🌟नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाला आली भरभराटी🌟
परभणी/पुर्णा (दि.१७ जानेवारी) - परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात गत २७ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास सर्वत्र झालेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते यात रब्बीतील ज्वारीची पिक आडवी झाली होती. परंतू ती लवचीक असल्याने पुन्हा उठून उभी राहिली रब्बी हंगामातील अन्य पिक गेली मात्र टाळकी ज्वारीला अवकाळीने जिवदान दिले.जमीनीत प्रदिर्घ काळ ओलावा टिकून राहिल्याने परभणी जिल्ह्यासह पूर्णा तालूक्यात तर शेकडो एकवर पेरणी केलेली ज्वारी बहारदार वाढलेली दिसून येत आहे.
पुर्णा तालुक्यात जिकडे पहावे तिकडे चोहीकडे कोरडवाहू जमीनीत यंदाच्या रब्बीत ज्वारीचे पीक जोरदार बहरल्याचे चित्र स्पष्टं होत आहे. सध्या ही ज्वारी निसवून कणसं उमलून बाळ हुरड्यात आली आहे.तसेच परभणी जवळील काही गावातील शेतकऱ्यांनी हुरडा ज्वारी ची देखील पेरणी केलीही तीही ज्वारी जोमात आलीय.त्यामुळे यंदा कधी नव्हेते अवकाळीच्या पावसाच्या कृपेने टाळकी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर बहरताना दिसत आहे. औंदा ज्वारीचे भरघोष उत्पादन होवून चाराही अधिक उत्पादीत होवून पशुधनाच्या वैरणीचा प्रश्न मिटणार आहे. येत्या काही दिवसात कृषी पर्यटन केंद्रासह शेतशिवारात हुरडा पार्ट्या जंगी रंगणार आहेत......
0 टिप्पण्या