🌟जेष्ठ रिपाइं नेते तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली मागील २२ वर्षांपासून केले जाते आयोजन🌟
पूर्णा (दि.१९ जानेवारी) : पूर्णा शहरात बाविसाव्या संविधान गौरव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील अनेक भिंतीवर कार्यक्रम पत्रिका रंगविली गेली असून अनेक ठिकाणी मोठ मोठे बॅनर्स लावले गेले आहेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मागील २२ वर्षांपासून जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन केले जाते प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी प्रजासत्ताक दिन दि.२६ व २७ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या संविधान गौरव सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय खासदार इम्तियाज जलील यांचे हस्ते होणार असून या संविधान गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे हे भूषविणार आहेत.
अखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य.भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भदंत पंय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या संविधान गौरव सोहळ्यात सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत प्रा.डॉ.भगवान वाघमारे लातूर व आर पि.आय.डेमॉक्रॅटिक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड हे आपले विचार मांडणार आहेत या कार्यक्रमास पुर्णेतील जमा मस्जिदचे पेश इमाम मौलाना शमीम अहमद रिझवी, उद्योगपती श्रीनिवास काबरा,परभणी जिल्हा शिवसेना (उबाठा)चे जिल्हा प्रमुख विशाल कदम,पुर्णेतील जनसामान्याचे नेते तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे,माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी, परभणी भुषण मा.उपनगराध्यक्ष तथा गट नेते उत्तमभैया खंदारे,पूर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे,पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौल,मुख्याधिकारी,जलील पटेल,ॲड.इम्तियाज खान,जिल्हाध्यक्ष एम.आय.एम,परभणी,फेरोज लाला,जिल्हाध्यक्ष एम.आय.एम नांदेड,सुप्रसिद्ध व्यापारी तथा अभिनव विद्या विहार प्रशाला या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद अजमेरा,विशाल चितलांगे,रवि जैस्वाल,पत्रकार दिनेश चौधरी,तुषार गायकवाड, लतिफ भाई,कांचन ठाकूर, ॲड.हर्षवर्धन गायकवाड,प्राचार्य राम धबाले, गोपाल कटोले,बँक मॅनेजर,आखिल अहमद,ॲड.धम्म जोंधळे,नितीन कदम,दिगंबर कऱ्हाले, ॲड.रवि गायकवाड,परभणी शफिकभाई, चांदसाब बागवान,मधुकर गायकवाड,संदीप ढगे,प्रवीण अग्रवाल आदि मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
भारतीय संविधान गौरव सोहळ्यांतर्गत या सतत दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनी डॉ.बाबासाहेब आंबेकर चौकात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.तर दि.२७ जानेवारी २०२४ रोजी शहरात संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.संविधान पर प्रमुख प्रबोधन कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात होईल.या निमित्ताने माननीय खासदार इम्तियाज जलील यांचा भव्य नागरी संत्काराचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत जेष्ठ रिपाइं नेते प्रकाशदादा कांबळे यांनी दिली असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गौरव समितीचे प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले, प्रा.अशोक कांबळे,रौफ कुरेशी,कॉ.अशोक कांबळे,शिवाजी वेडे,मोहन लोखंडे,भारत जोंधळे,विजयकुमार जोंधळे,गौतम कांबळे,रमेश बरकुंटे, बंडु गायकवाड,भिमा वाहुले,ॲड.सूर्यकांत काळे,गौतम काळे,पंडित डोंगरे,मिलिंद कांबळे,सुनील जाधव,मुकुंद पाटील आदि गौरव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या