🌟पुर्णा तालुक्यातील माखणी गावातील अल्पभूधारक शेतकरी जनार्दन आवरगंड यांच्या कर्तृत्वाला त्रिवार सलाम🌟
(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे कृषी पुरक उद्योग क्षेत्रातील 'समाज भषण' जनार्दन आवरगंड)
लेखक - चौधरी दिनेश (रणजित)
पुर्णा तालुक्यातील ताडकळस लागत असलेल्या माखणी या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी जनार्दन आवरगंड यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात नावलौकिक मिळवले असून शेतीतील उत्पादनांवर प्रक्रिया करून कृषीपुरक उद्योगाची यशस्वी मुहूर्तमेढ रोवणारा अन्नदाता शेतकरी म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण जिल्हा पाहात आह.
काळ्या मातीवर श्रध्दापूर्वक प्रेम करणारे व्यक्तीमत्व असलेल्या जनार्दन आवरगंड यांनी आपल्या मृदू स्वभावाच्या जोरावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजकीय पुढारी प्रशासकीय अधिकारी व समाजातील विविध घटकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे जनार्दन आवरगंड यांनी शेती एके शेती न करता शेतीतील उत्पादनांवर प्रक्रिया करून त्याचे पॅकिंग करून स्वतः आपले उत्पादन बाजारपेठेत प्रसंगी घरोघरी जाऊन विकण्याचा कृषीपुरक उद्योग सुरु केला त्यांचे संपूर्ण कुटुंब या कृषीपुरक उद्योगात निष्ठापूर्वक व प्रचंड क्षमतेने राबते त्यांनी आपला स्वतःचा 'ओंकार' हा ब्रॅंड सर्वदूर पोहोचवला दिपावलीचे उठणे,खमंग चटण्या,लोनच,घाण्याचे तेल,सेंद्रिय दाळी,सुऱ्या,लाडू, मसाले,पापड्या,खारवड्या,वडे असे अनेक पदार्थ तयार करून खवैय्यांना अक्षरशः भुरळ पाडण्याचे कौतुकास्पद कार्य त्यांनी केले हे सर्व करत असताना शेतीसेवा ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना कृषीपुरक जोडधंद्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले अनेक शेतकऱ्यांसाठी ते दिपस्तंभ ठरले म्हणून प्रत्येक उच्चपदस्थ अधिकारी नेते मंडळींना त्यांना सातत्याने भेटण्याची इच्छा होत असते त्यांची साधी राहणी मवाळ बोलने व निगर्वीपणा ही आभुषणे ठरली त्यांच्या या कौतुकास्पद कार्याला दैनिक क्रातिशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराकडून शतशः मानाचा मुजरा.
आपल्या हातून अशीच राष्ट्र व कृषी सेवा घडो या शुभेच्छांसह आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....
टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुनः प्रसिध्दी
0 टिप्पण्या