🌟परभणी येथील लोकनेते विजय वाकोडे यांना यांना 'नामांतर योद्धा' पुरस्कार प्रदान.....!


🌟धम्म मैत्री अभियान आयोजित शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्यात त्यांनी सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान🌟 

परभणी : परभणी येथील कल्याण नगर परिसरातील आयएमए सभागृहात काल शनिवार दि.२० जानेवारी रोजी धम्म मैत्री अभियानच्या वतीने शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत तथा दै लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक श्री संजय आवटे उपस्थित होते याप्रसंगी लोकनेते विजय वाकोडे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजा) सिद्धार्थ हत्तीअंबीरे,विभागीय सहाय्यक आयुक्त डॉ.भारत कदम,परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत,प्राचार्य प्रा डॉ सुरेश सदावर्ते,किरण धोंगडे,डॉ प्रकाश डाके आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात लोकनेते विजय वाकोडे यांना 'नामांतर योद्धा' पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संजय बगाटे,कचरू गोडबोले,वनामकृवीचे सहाय्यक कुलसचिव सुरेश हिवराळे,भूषण मोरे यांनी परिश्रम घेतले.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या