🌟 तहसिलदार बोथीकर यांना तक्रार दिल्यानंतर ही कारवाई नाही : शेतकरी बसले उपोषणाला🌟
पुर्णा (दि.२४ जानेवारी) ; पुर्णा तालूक्यातील पांगरा ढोणे येथील पूर्णा-पांगरा मुख्य रोडपासून तरंगल शिवारातील गट क्रमांक ५४ ते ५७ शेताकडे जाणारा जुना वहिवाट रस्ता गट क्रमांक ७३,७४ च्या शेतमालकांनी अचानक खोडसाळपणे पोकलेन मशिनने खोदून नाला काढुन बंद केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सदरील रस्ता पुर्ववत खुला करुन देण्याकरीता परिसरातील शेतकऱ्यांनी पुर्णेचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांना मागील दिड महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज देवूनही तहसिलदार बोथीकर यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे संताप व्यक्त होत असून सदरील रस्ता खुला करुन दिला नाही उलट तहसिलदार बोथीकर यांनी शेतकऱ्यांनाच उपोषणास बसू नका नसता तुम्हाला जेल मधी टाकतो असे धमकावल्यामुळे शेतकरी आत्माराम ढोणे, उत्तमराव ढोणे, देविदास ढोणे, संतोष ढोणे, भानूदास ढोणे, जळबाजी ढोणे, ज्ञानदेव ढोणे,रामदास ढोणे या शेतकऱ्यांनी रस्ता खोदलेल्या नाल्या नजीक शेताच्या बांधावर सदर रस्त्यातील खोदलेली नाली बुजवून रस्ता पूर्वरत खुला करण्याच्या मागणीसाठी तारीख २४ जानेवारी २०२४ पासून अमरण उपोषण चालू केले आहे. रस्ता बंद करण्यात आल्याने सदरील शेतक-यांचा विस एकर ऊस शेतात उभा असून तो रस्त्याअभावी साखर कारखान्याकडे गाळपासाठी नेता येत नाही तसेच माणसांनाही शेतात जाणे येणे बंद झाले आहे. या उपोषणाची दख्खल परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रागसुधा आर कितपत घेतात ? असा प्रश्न पांगरा ग्रामस्थांना पडला आहे.....
0 टिप्पण्या