🌟परळीत होणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनामुळे परळीचा नावलौकिक वाढेल - प्रदीप खाडे


🌟संमेलनाच्या बोधचिन्हाचे झाले विमोचन🌟


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरात होणारे साप्ताहिक शिक्षण मार्ग च्या वतीने आयोजित 6 व्या  विभागीय मराठवाडा शिक्षक साहित्य संमेलनामुळे परळी शहराचा नावलौकिक वाढेल असा आत्मविश्वास संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव  प्रदीप खाडे यांनी व्यक्त केला. संयोजन समितीच्या वतीने स्वागत अध्यक्ष प्रदीप खाडे तसेच संमेलन अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ ए.तु. कराड यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.


   याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अतुल दुबे, उद्योजक सुरेश नाना फड, गोविंद मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी सहाव्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रदीप खडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप खाडे यांनी परळीत होणाऱ्या साहित्य संमेलना विषयी आपली भूमिका विशद केली तसेच शिक्षकांचा आणि साहित्यिकांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभल्याचेही ते म्हणाले यावेळी संमेलन अध्यक्ष ए.तु.कराड, प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे, प्राचार्य अतुल दुबे, रानबा गायकवाड, सुरेश नाना फड यांनीही आपले विचार मांडले

    यावेळी प्रा. संजय आघाव, विठ्ठलराव दादा झिलमेवाड, पत्रकार महादेव गीते, विद्याधर शिरसाठ आदीसह संयोजन समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बा. सो. कांबळे यांनी तर आभार सिद्धेश्वर इंगोले यांनी मांडले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या