🌟मोडकळीस आलेली शाळेची इमारत पाडून तेथे नविन ईमारत बाधून देण्याची आग्रही मागणी🌟
पुर्णा : पुर्णेतील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची इमारत ही निजामकालीन असल्यामुळे ह्या शाळेच्या बांधकामास सुमारे पाऊण शतक अर्थात पंचाहत्तर वर्षे लोटली असल्याने आता ही ईमारत अत्यंत कमकुवत व मोडकळीस आलेली आहे.पावसाळ्यात या इमारतीतून पावसाचे पाणी देखील गळते प्लॅस्टरचे पापूर्दे गळून पडतात.त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक आपला जीव मुठीत घेवून अध्यापनाचे काम करतात या इमारतीत शहरातील अनेक प्रभागाचे निवडणुकीचे बुथसुद्धा आहेत याशिवाय शैक्षणिक बैठकांचे कामकाजही या इमारतीच्या वर्गखोल्या मधून बरेचवेळा होते.
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची ही मोडकळीस आलेली इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत बांधून देण्यासाठी शालेय शिक्षण समितीने अनेकवेळा ठराव घेवून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे परंतु अध्याप देखील याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले गेले नसल्याने शालेय शिक्षण समितीच्या वतीने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना निवेदन देऊन मोडकळीस आलेली शाळेची इमारत पाडून तेथे नविन ईमारत बाधून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे......
या निवेदनाच्या प्रति मा.जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद परभणी,शिक्षणाधिकारी परभणी यांना देण्यात आल्या आहेत या निवेदनावर शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा आशाबाई मोहन लोखंडे,प्रकाश कांबळे,शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गवुळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या