🌟सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या काळ्या कायद्या विरोधात स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी दिला पक्षपदाचा राजीनामा...!


🌟धार्मिक मुलभूत अधिकार आणि माझ्या समाजापेक्षा मला माझे कुठलेही पद मोठे नाही - सरदार मनबीरसिंघ ग्रंथी 

महाराष्ट्र सरकारने सिख धर्मियांच्या पाच सर्वोच्च तख्तांपैकी एक सर्वोच्च तख्त असलेल्या सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या काळ्या कायद्या विरोधाला तीव्र विरोध दर्शवत या काळ्या कायद्यासह  महाराष्ट्रातील लोकशाही विरोधी सरकारच्या निषेधार्थ आज सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदासह गंगाखेड विधानसभा निरिक्षक पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याकडे पाठवला आहे.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी आपल्या राजीनामा पत्रात असे नमूद केले की पक्षाने मला दिलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव तथा गंगाखेड विधानसभा निरिक्षक पदाचा मी राजीनामा देत असून तो कृपया स्विकार करावा कारण मला प्रथमतः माझा समाज मोठा आहे आणि मी समाजाच काही देणं लागतो महाराष्ट्र सरकारने मनमानी पद्धतीने सचखंड गुरुद्वारा बोर्ड संदर्भातील गुरुद्वारा ॲक्ट १९५६ हा कायदा हटवून या कायद्यात बदल करीत गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा सिख धर्मियांच्या धार्मिक मुलभूत अधिकारावर गदा आणणारा काळा कायदा पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादला हा काळा कायदा आम्हा संपूर्ण सिख समुदायाला मान्य नाही स्थानिक सदस्यांना डावलून महाराष्ट्र राज्य सरकारने हा कायदा सचखंड गुरुद्वारा बोर्डावर थोपला असल्याने त्याचा निषेध म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही म्हणून माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा असेही आपल्या राजीनामा पत्रात स.मनबीरसिघ ग्रंथी यांनी म्हटले असून त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस गोटात खळबळ माजली आहे.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या