🌟गुरुद्वारा गेट नंबर एक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निघणार विरोध मोर्चा🌟
नांदेड (दि.०८ फेब्रुवारी) - महाराष्ट्र सरकारने गुरुद्वारा सचखंड बोर्ड ॲक्ट १९५६ यात संशोधन करुन दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा पास केला असून तो सचखंड गुरुद्वारा बोर्डावर लादण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यामुळे स्थानिक सिख समाजाचा गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष निवडण्याचा मुलभूत हक्क सरकारने लादलेल्या या गुरुद्वारा अधिनियम २०२४ मुळे हिरावला जाणार असल्यामुळे व महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक सिख धर्मियांच्या धार्मिक बाबींमध्ये सरळसरळ हस्तक्षेप करीत असल्यामुळे स्थानिक सिख समाजात तिव्र असंतोष पसरला असून या नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ विरोधात सन्माननीय पंचप्यारें साहिबान यांच्या आदेशानुसार सिख समाजाच्या वतीने उद्या शुक्रवार दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजता गुरुद्वारा गेट नंबर एक ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड असा भव्य जाहीर विरोध मोर्चा काढण्यात येणार आहे.
नांदेड सचखंड गुरुद्वारा सिख समाजाच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक असून सदरील पवित्र तिर्थक्षेत्र सिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते गुरुद्वारा ॲक्ट १९५६ नुसार गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष निवडण्याचे सर्वाधिकार स्थानिक सिख समाजाचे असल्याने महाराष्ट्र सरकार यात जाणीवपूर्वक संशोधन करुन नवीन गुरुद्वारा अधिनियम २०२४ लादण्याचा प्रयत्न करीत असून हे सिख धर्मियांच्या धार्मिक अधिकारांची गळचेपी असल्याने पुर्वीच्या गुरुद्वारा ॲक्ट १९५६ मध्यें करण्यात आलेले सर्व संशोधन रद्द करण्यात येवून सदरील नवीन गुरुद्वारा अधिनियम २०२४ संपूर्णतः हटवून पुर्वीचाच गुरुद्वारा ॲक्ट १९५६ बहाल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण सिख समाजाच्या वतीने जाहीर विरोध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चा संदर्भात आज गुरुवार दि. ०८ फेब्रुवारी रोजी सिख समाजाच्या वतीने नांदेडचे जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर या निवेदनावर गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष शेरसिंग फौजी,माजी सचिव रवींद्रसिंग बुंगई,सदस्य राजेंद्रसिंग पुजारी,मनप्रितसिंग कुंजीवाले, गुरमितसिंग महाजन जर्नलसिंघ गाडीवाले, सरदार मनबीरसिंघ ग्रंथी,जगदीपसिंग नंबरदार, महेंद्रसिंग पैदल, तेजासिंह बावरी, हरभजनसिंग दिगवा, गुरमीतसिंग बेदी, किरपालसिंग हजुरिया, मनप्रितसिंग कारागिर, दीपकसिंग गल्लीवाले, गुरमीतसिंग बेदी, जसबीरसिंग धुपिया, जसपालसिंग लांगरी, रवींद्रसिंग मोदी, रवींद्रसिंग पुजारी, दिलीपसिंग रागी , भोला सिंग गाडीवाले अमरजीतसिंग पंजाबसिंग गिल, दीपसिंग , पुरणसिंग, राजेंद्रसिंग शाहू,हरभजन सिंग पुजारी गुरुदेवसिंग रामगडिया गुरमीतसिंग महाजन, महेंद्रसिंग लांगरी, गुरुप्रीतसिंग सोखी, अवतारसिंग पहरेदार यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....
0 टिप्पण्या