🌟'निर्भय बनो' सभेला जातांना भाजपच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर अर्ध्या तासात केला ४ वेळा हल्ला🌟
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांच्या समवेत निर्भय बनोच्या सभेला जात असताना भाजपच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर अर्ध्या तासात चारवेळा पाठलाग करून दगड, लाठ्या-काठ्या, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड यांच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढवला. हा हल्ला पूर्वनियोजित आणि पोलिसांच्या सहमतीने झाल्याचा आरोप होतो आहे. वागळेंवरील या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील विविध पत्रकार संघटना आणि सर्व पत्रकारांची निदर्शने सोमवार १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे ठेवण्यात आली आहेत. सर्व पत्रकारांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती एस.एम.देशमुख (अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद),नरेंद्र वाबळे(मुंबई मराठी पत्रकार संघ), गुरुबिर सिंग (प्रेसक्लब),प्रमोद डोईफोडे (मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ), श्री. विनोद जगदाळे (टीव्ही जर्नलिस्ट आसो), सोनवणे (बृहन्मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ), प्रवीण काजरोळकर (प्रेस फोटोग्राफर असो.) यांच्या तर्फे करण्यात आली आहे........
0 टिप्पण्या