🌟वैज्ञानिक दृष्टीकोण स्वीकारल्याशिवाय भारताची प्रगती होणार नाही - डॉ.संतोष रणखांब


🌟मौजे पांगरा येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या व्याख्यानमालेचे पुष्पगुंपताना बोलत होते🌟

पुर्णा (दि.२१ फेब्रुवारी) - भारतीय लोकांनी वैज्ञानिक दृष्टीकोण स्वीकारुन ज्ञानाचा मार्ग अंगीकारल्याशिवाय भारताची प्रगती होणार नसल्याचे प्रतिपादन डाव्या चळवळीतील समर्पित कार्यकर्ते तथा व्याख्याते प्रा.डॉ.संतोष रणखांब यांनी केले. ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पांगरा येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या व्याख्यानमालेचे पुष्पगुंपताना बोलत होते. 


या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते. " वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी जीवन " या विषयावर प्रा.डॉ.संतोष रणखांब प्रमुख व्याख्याते म्हणून बोलतांना म्हणाले की मानवी जीवनात अज्ञान आणि अंधश्रद्धेची होळी केल्याशिवाय भारतीय समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणार नाही. आजपर्यंत भारत देश अविकसित राहाण्याचे प्रमुख कारण अंधश्रद्धा आणि अज्ञान असून भावी पिढीच्या तरुणांनी नव्या विचारधारेचे स्वागत करून मानवी हिताचे कार्य केले पाहिजे. नवे नवे शोध लावून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा व बुद्धीचा उपयोग केला तर निश्चितच देश पुढे जाईल असा विश्वास ही त्यांनी यावेळी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी मानले या कार्यक्रमासाठी पांगरा या गावातील प्रतिष्ठित नागरिक ,महिला व विद्यार्थी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या