🌟वाशिम येथे वक्तृत्व स्पर्धेत दिडशे बाल वक्तयांच्या धडाडल्या तोफा....!


🌟सार्वजनिक शिवजयंती उत्सवसमीतीचे आयोजन🌟

फुलचंद भगत

वाशिम - येथील सार्वजनिक शिवजयंती ऊत्सव समीतीचे वतीने आयोजित दहा ते तिस वर्षे वयोगटातील सुमारे दिडशे बाळ गोपाळांच्या सहभागाने वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.

स्थानिक पत्रकार भवनात रविवारी (दि.१८) ला आयोजीत ह्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांचे हस्ते सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कोषाध्यक्षा संजीवनीताई बाजड, विभागीय अध्यक्षा सुरेखाताई आरू, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष विशाल वानखेडे, समीतीचे उपाध्यक्ष संजय वैरागडे, संभाजीनगरचे शरद पाटील, व्याख्याते शंकर भारती, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, नामदेवराव हजारे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेला सुप्रीम कोर्टाच्या प्रसिद्ध विधिज्ञ अर्चना प्रशांत सुर्वे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कोषाध्यक्ष संजीवनीताई बाजड, कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी या वक्तृत्व स्पर्धेला उपस्थिती दर्शवून बाल स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धात दीडशेचे आसपास वबाल वक्त्यांची भाषणे जोशपूर्ण आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला डोळ्यासमोर उभे करणारे, अंगावर शहारे आणणारे होती. विशेष म्हणजे सावित्री जिजाऊंच्या लेकींचा सहभाग उल्लेखनीय होता. उद्घाटन पर भाषणात वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी छत्रपती शिवरायांचा सुवर्ण इतिहासाची माहिती मांडणारी बालके हे शिवरायांचे मावळे होत असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर वाघ यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नारायणराव काळबांडे यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या नियमाबाबत तसेच बक्षीस वितरणाबाबत माहिती दिली. परीक्षक म्हणून प्रा. गजानन वाघ, यासीन शेख मॅडम, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे प्रदेश पदाधिकारी पी.एस खंडारे यांनी काम पाहिले. तर  सूत्रसंचालन प्रसिद्ध व्याख्याते महेश देवळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडच्या वरील पदाधिकार्‍यांसह विकास देशमुख, वाशीम विधानसभा प्रदेश अध्यक्ष नयन कर्हे,  संभाजी ब्रिगेडचे महासचिव इसाक शेख सह पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या