🌟प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟
पुर्णा (दि.२८ फेब्रुवारी) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या"करियर कट्टा" उपक्रमांतर्गत उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते आज दिनांक २८फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विचारमंचावर करिअर कट्टा महाराष्ट्राचे समन्वयक प्रा.डॉ. यशवंत शितोळे,मराठवाडा विभागीय समन्वयक प्रा. डॉ.सतीश चव्हाण,सहसंचालक उच्च शिक्षण विभाग,नांदेडचे सहसंचालक डॉ. किरण बोंदर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयात प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर कट्टा अंतर्गत उद्योजकता समन्वयक प्रा.डॉ.संजय कसाब यांनी परभणी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी महाविद्यालयातर्फे जिल्हा उद्योग केंद्रास भेट देण्यात आली होती.तसेच करिअर कट्टाचे परभणी जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समन्वयक प्रा.डॉ.विजय भोपाळे यांनी महाविद्यालयात आर्थिक साक्षरता व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
महाविद्यालयात प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.....
0 टिप्पण्या