🌟क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव - श्री गणेश बुद्धे


🌟पुर्णेतील लिटिल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलना प्रसंगी ते म्हणाले🌟 

पूर्णा : शहरातील महावीर नगर परिसरातील लिटिल किंग्ज इंग्लिश स्कूल चा दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.यात विविध खेळ, सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व कार्यक्रमाचा समारोप शहरातील गोंधळ सम्राट राजारामबापू सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने पार पडला.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावली एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री गणेश‌ बुद्धे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री काशिनाथ लोखंडे उपस्थित होते.. प्रमुख पाहुणे म्हणून शहर व ग्रामीण परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.मान्यवरांच्या  हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध एकल नृत्य, समुह नृत्य, अभिनय, नाटके सादर करुन आपल्या कलागुणांना सादर करण्याचा प्रयत्न केला. यात देशभक्तीपर गीते, भक्तीमय गीते यावर विद्यार्थ्यांनी नृत्य व अभिनय सादर केले. चिमुकल्यांनी धार्मिक व ऐतिहासिक वेशभूषा सादर करुन रसिकांची मने जिंकली. अध्यक्षस्थानी असलेल्या श्री गणेश बुद्धे यांनी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर कसे घालतात यांचे यथोचित वर्णन केले व असे उपक्रम सदैव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात यावर भाष्य केले. इयत्ता सातवीचा विद्यार्थी सम्यक कांबळे याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.मोनिका शिराळे व सौ. प्रतिभा शिरसकर यांनी केले तर आभार कु. कोमल जोंधळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री काशिनाथ लोखंडे यासह श्री जलील अहमद, सत्यनारायण कणसे, पवन असोरे, गजेंद्र ठाकूर, श्रद्धा टाकळकर, मनिषा ढोणे, जोंधळे मिस, वाघमारे मिस, भाग्यश्री मुर्गे, रशिदा बेगम, राधा भारती आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या