🌟निष्ठेला जेव्हा दाद मिळते : नांदेड येथील डॉ.अजित गोपछडे हे नाव आणि हा चेहरा महाराष्ट्राला गेल्या दशकापासून सुपरिचित....!


🌟डॉ.अजित गोपछडे यांच्यावर त्यांच्या शालेय जीवनापासून संघाचे सुसंस्कार : लवकरच होणार राज्यसभा खासदार🌟


 
(जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या लेखणीतून...✍🏻)

नांदेड : नांदेड येथील डॉ.अजित गोपछडे हे नाव आणि हा चेहरा महाराष्ट्राला गेल्या दशकापासून सुपरिचित झाला आहे आज डॉ.अजित गोपछडे यांना भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी  मिळाली आहे ही हृदयस्पर्शी सुवार्ता थोड्या वेळापूर्वी माध्यमातून झळकली आणि एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाकडून दाद मिळाल्याची ती प्रचिती वाटली म्हणून ही त्यांच्या परिचयाची पोस्ट जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या लेखणीतून प्रसिद्ध करीत आहोत 

डॉ.अजित गोपछडे हे माझा जिवलग मित्र मनोज यांचे भाऊ तर माझा दुसरा मित्र रमेश श्रीमनवार हा अजित गोपछडे यांचा मोठा चाहता आहे डॉ.अजित गोपछडे हे तसे नांदेड शहरातील मोठे बालरोगतज्ञ त्यांचे स्वतःचे प्रशस्त असे हॉस्पिटल आहे आणि त्यांची स्वतःची प्रॅक्टिसही धोधो चालणारी असतांनाही त्यांचे अंतर्मन मात्र पक्षाच्या विचारसरणीसाठी स्वतःला झोकून द्यावे या मानसिकतेचे असल्याने त्यांनीं गेल्या दिड दशकापासून आपल्या हॉस्पिटलची जबाबदारी gynecologist असलेल्या आपल्या पत्नीवर सोपवून टाकली तिथून ते पूर्णवेळ पक्ष कार्य करत राहिले डॉ.अजित गोपछडे यांच्यावर त्यांच्या शालेय जीवनापासून संघाचे सुसंस्कार झाले असून कोणतीही अपेक्षा न करता अथक परिश्रम करण्याची त्यांची क्षमता आहे आयुष्यात चांगली ध्येये प्राप्त करण्यासाठी परिश्रम करावे लागतातच याची त्यांना सुयोग्य जाणीव लहानपणापासूनच आहे खरे तर गेल्या वर्षी विधान परिषदेची उमेदवारी त्यांना पक्षाकडून मिळाली होती परंतु वेगवेगळ्या कारणाने ती उमेदवारी तशीच राहिली त्या न घडलेल्या गोष्टीचा विचार सोडून डॉ.गोपछडे हे पक्षातील वैद्यकीय क्षेत्रासाठी असलेल्या सेलचे राज्यभराचे सारे कार्य करीत राहिले राष्ट्रीय स्तरावरही ते कार्यरत होतेच आयुष्याची अनेक वर्षे संघ परिवारासह/भाजप पक्षाला वाहून घेतलेली जी व्यक्तिमत्वे आमच्या नांदेड जिल्ह्यात आहेत त्यापैकी डॉ.अजित गोपछडे एक आहेत.

 नांदेड जिल्ह्याच्या पूर्वीच्या राजकीय वातावरणात, तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या पक्षाचे काम करताना त्यांनी  पक्षनिष्ठेपायी जो त्रास भोगला असावा त्याची मला माहिती नसली तरी थोडीफार कल्पना करता येते आज आमचा संपूर्ण नांदेड जिल्हा त्यांच्या निष्ठेचा उचित गौरव बघून त्यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे आनंदी झाला आहे एवढं मात्र निश्चितच म्हणता येईल.नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बारावीच्या वर्गातील एक अत्यंत हुशार विद्यार्थी असलेल्या डॉ.अजित गोपछडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले आहे बिलोली तालुक्यातील बोरगाव येथील सुस्थापित असलेल्या गोपछडे घराण्यातील डॉ.अजित गोपछडे हे सुपुत्र आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या