🌟'युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास' ही संकल्पना घेऊन या विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन🌟
पूर्णा (दि.१७ फेब्रुवारी) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष वार्षिक शिबिराचा मौजे पांगरा (ला) तालुका पूर्णा येथे समारोप करण्यात आला.दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते 'युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास' ही संकल्पना घेऊन या विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान गावकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये प्रामुख्याने गावकऱ्यांसाठी मोफत रक्त तपासणी शिबीर, शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण कार्यशाळा, पशुचिकित्सा शिबीर,गावातील बालकांची आरोग्य तपासणी, माता आरोग्य तपासणी,वृक्षारोपण इत्यादी उपक्रम गावकऱ्यांसाठी राबविण्यात आले.
दररोज सकाळच्या सत्रामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता केली तर दुपारच्या सत्रामध्ये गावकऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराचा समारोप नुकताच संपन्न झाला. समारोपप्रसंगी प्रमुख राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी डी. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच श्री. उत्तमरावजी ढोणे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पी. डी. सूर्यवंशी म्हणाले की, शिबिर हे एक निमित्त असून गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ग्राम स्वच्छतेची चळवळ पुढे चालवली पाहिजे. तर अध्यक्षीय समारोपात श्री. उत्तमरावजी ढोणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील उपक्रमांचे कौतुक करुन भविष्यातही अशा उपक्रमांना गावाची नक्कीच साथ राहील असे आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनेक शिबिरार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी जोगदंड या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन प्रा. अतुल शिंदे यांनी मानले .हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. डी. सूर्यवंशी ,डॉ. दीपमाला पाटोदे , प्रा.अतुल शिंदे, प्रा. सुरेश वावळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व पांगरा येथील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले......
0 टिप्पण्या