🌟जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दि.13 फेब्रुवारी ते दि.23 फेब्रुवारी दरम्यान फिरते लोकन्यायालय🌟
परभणी (दि. 07 फेब्रुवारी) : नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये 13 ते 23 फेब्रुवारीदरम्यान फिरते लोकन्यायालय व विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी केले आहे.
या फिरते लोकन्यायालय व शिबिराचे सोमवार (दि.05) सकाळी 10.30 वाजता परभणीतील जिल्हा न्यायालय परिसरात उद्घाटन करण्यात आले आहे. प्रारंभी हिंगोली जिल्ह्यात (दि. 05 ते 12) आयोजन करण्यात आले असून, परभणी जिल्ह्यात 13 ते 23 फेब्रुवारीदरम्यान शिबीर राहणार आहे. जिंतूर तालुक्यातील (दि.13) कौसडी आणि बोरी, सेलू तालुक्यातील (दि.14) निपाणी टाकळी आणि ढेंगळी पिंपळगाव, मानवत तालुक्यातील (दि. 15) अंबेगाव आणि सावरगांव, पाथरी तालुक्यातील (दि.16) हादगाव नखाते, सोनपेठ तालुक्यातील (दि.17) सायखेडा आणि शेळगाव, गंगाखेड तालुक्यातील (दि.20) खादगाव आणि अकोली, पालम तालुक्यातील (दि.21) केरवाडी आणि चाटोरी, पुर्णा तालुक्यातील (दि.22) कानखेडा आणि ताडकळस तसेच 23 फेब्रुवारी रोजी परभणी तालुक्यातील बलसा खुर्द आणि जिल्हा न्यायालय परिसरात फिरते लोकन्यायालय आणि शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.......
0 टिप्पण्या