🌟रमजान महिन्यात आलेल्या 'होळी धुळवड' सनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचे पोलीसांपुढे मोठे आव्हान....!


🌟मद्यधुंद अवस्थेत अश्लील भाषेत शिविगाळ करणाऱ्या हुल्लडबाज टोळ्यांवर पोलीस दल करडी नजर ठेवणार काय🌟

🌟लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता 🌟

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता त्यातच रमजान महिना आणि रमजान महिन्यात आलेला होळी धुळवडीचा सन अश्या परिस्थितीत 'कायदा व सुव्यवस्था' अगदी डोळ्यात तेल घालून हाताळण्याची जवाबदारी मुंबई पोलीस दला प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रा राज्यासह परभणी जिल्हा पोलीस जिल्ह्यातील पुर्णा  पोलीस दलावरही आल्यामुळे पोलीस दलाला अत्यंत चोखपणे कर्तव्य बजावावे लागणार आहे देशासह संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागलेली असतांना एकीकडे आचारसंहिता भंग होता कामा नये याकरिता पोलिस दल विशेष भुमिका बजावत असतांनाच पवित्र रमजान महिना लागल्याने आता पोलिसांना दुहेरी जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार असतांना त्यातच पुन्हा 'होळी धुळवड' सनाच्या बंदोबस्ताची तिसरी महत्त्वाची जवाबदारी देखील पोलिस दलाला पार पाडावी लागणार असल्याने अपुरा पोलीस फोर्स असणाऱ्या स्थानिक पुर्णा पोलीस दलाला अतिरिक्त पोलिस दलासह होमगार्ड आणि वेळ प्रसंगी रॅपिड ऍक्शन फोर्सचे सहकार्य सुध्दा घ्यावे लागणार आहे.

राज्य अंतरराज्यासह अंतरराष्ट्रात जरी एखादी घटना घडली तरी त्या घटनेचे पडसाद पुर्णा शहरात उमटणार नाही तर नवलच म्हणावें लागेल अश्या या शासकीय दप्तरी अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद असलेल्या पुर्णा शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळ्याची जवाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील व पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांच्यावर असल्यामुळे त्यांना पोलीस प्रशासनाचे तिसरे नेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांना लक्ष वेधण्यासाठी सुसज्ज ठेवावे तर लागणारच आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचे शहरातील अत्यंत महत्त्वाच्या चौक परिसरामध्ये चोख असा शस्त्रसज्ज पोलीस बंदोबस्त देखील ठेवावा लागणार आहे.

पुर्णा शहरात मागील काळात घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी पाहता शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर नागरी वसाहतींमध्ये मद्यधुंद अवस्थेत सुद सोडून अर्वाच्य व अश्लील भाषेत दिसेल त्याला शिविगाळ करीत वेळप्रसंगी एकमेकांच्या अंगावरील कपडे फाडत नग्न तांडव करत फिरणाऱ्या मोकाट टोळ्यांवर देखील पोलिस प्रशासनाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे कारण या गंभीर प्रकारातून निष्कारण मन दुखावल्यास याच दुरगामी परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे मद्य प्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

पुर्णेतील उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील व पोलिस निरीक्षक विलास गोबाळे यांनी अल्पशा कालावधीत शहरासह तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कर्तव्य बजावण्यास सुरुवात केल्याने त्यांच्यात प्रत्येक आव्हानांना तोंड देण्याची कर्तृत्व क्षमता असल्याचे मागील काही घटनांवरून निदर्शनास येते त्यामुळे त्यांनी कठोर उपाययोजना करण्यापुर्वीच सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ माजवून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या हुल्लडबाज मोकाट टोळक्यांनी वेळीच सावरलेल बरं असे मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे...

🌟मुंबई पोलीस दलाने होळी धुळवडीसह आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली नियमावली :-

🔴 या कालावधीत फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू,गोष्टींचे प्रदर्शन अथवा प्रसारण करू नये.

🔴रंगपंचमी अर्थात धुळवड साजरी करताना येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारू किंवा फेकू नये.

🔴 तसेच रंग खेळताना रंगीत किंवा साधे पाणी, कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे मारू किंवा फेकू नये.

🔴 सणांच्या काळात अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण करू नये किंवा अश्लील गाणी सुद्धा म्हणू नयेत

🔴अश्लील हावभाव किंवा नक्कलाचा वापर करू नये.

🔴कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावेल अशी चिन्हे, चित्रे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू,गोष्टींचे प्रदर्शन अथवा प्रसारण करू नये

दरम्यान, या आदेशाचे कोणीही उल्लंघन केले किंवा या आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत केली तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार शिक्षा केली जाणार आहे. हे आदेश व नियम 5 मार्च 2023 ते दिनांक 11 मार्च 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या