🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगारातील जिंतूर-सोलापूर बस पुलावरून कोसळल्याने वीस प्रवासी जखमी....!


🌟जिंतूर तालुक्यातील अकोली जवळील दुर्दैवी घटना🌟

परभणी (दि.२० मार्च)परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगारातील राज्य परिवहन महामंडळाची जिंतूर-सोलापूर बस आज बुधवार दि.२० मार्च रोजी सकाळी ०८-३० वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील अकोली जवळील पुलावरून खाली कोसळून झालेल्या भयंकर अपघात बस मधील १८ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.


परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगाराची राज्य परिवहन महामंडळाची ही बस सोलापूर कडे निघाली असता अकोली जवळील पुलाच्या काही अंतरावरील वळणावरील अरुंद पुलावर बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने सदरी बस तब्बल ५० फूट खाली नदी पात्रात कोसळली प्रत्यक्ष दर्शनींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना कसबशे बाहेर काढले.

या अपघातात १८ ते २० प्रवासी जखमी झाले या जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी धावून गेले आहेत.अकोली येथील या वळणावर यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या