🌟नांदेड कैकाडी समाज मानकरी मंडळ श्री क्षेत्र मढी येथे रवाना.....!


🌟या यात्रेला महाराष्ट्र,राजस्थान,गुजरात,आंध्र प्रदेश,आदी प्रांतांमधून साधारणतः २० ते २५ लाख भाविक येतात🌟

ब्रम्हचैतन्य श्री कानिफनाथ महाराजांनी दहाव्या शतकात फाल्गुन वद्य रंगपंचमीला अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील मढी येथे गडावर संजीवन समाधी घेतली. यानिमित्त दरवर्षी मढी येथे होळी ते गुढीपाडवा या कालावधीत यात्रौत्सव साजरा केला जातो.


या यात्रेला महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश,आदी प्रांतांमधून साधारणतः २० ते २५ लाख भाविक येतात. ( अंदाजित)अठरा पगड जाती-जमातीचे लोक घराण्याची पूर्वापार श्रद्धा जपत यात्रेत सहभागी होतात. श्रीक्षेत्र मढीला कैकाडी,भटक्यांची पंढरी असेही म्हटले जाते.रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी नाथसमाधी दिन आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक श्रीकानिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या पवित्र दिवशी नाथसिद्धांचे आखाडे, विविध ठिकाणाहून आलेल्या मानाच्या काठ्या व पालख्या मढीमध्ये दाखल होतात. कैकाडी समाजाच्या काठीला येथे पहिला मान आहे . हभप श्री नारायणबाबा जाधव महाराज,रोहिदास जाधव, अर्जुन जाधव, कै.प्रकाश जाधव, मा. नगर सेवक सुनील जाधव, विजय जाधव,भीमराव जाधव, अशोक जाधव,सीताराम जाधव, अनिल जाधव, शिवा जाधव, बबन जाधव, राहुल जाधव, राजू जाधव, रितेश जाधव,सर्व राहणार नांदेड आदी घराण्यातील समाज बांधव पिढ्यान पिढ्या पूर्वापार श्रद्धा जपत एकत्र येऊन धूम धड्याक्यात मानाच्या काठीची परंपरा वर्षानु वर्ष चालू ठेवली आहे. मानाच्या काठीचा उत्सव परंपरेनुसार आजही चालू आहे. यावेळी नाथाच्या जय जय काराने व डफ डोल ताशाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून जाते.दि.24/3/24 रोजी होळीच्या दिवशी सकाळी नऊ वा.मानाची काठी वाजत- गाजत नाथांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात समाधीला स्पर्श केली जाते. कानिफनाथ महाराज की जय, नाथ बाबा की जय असा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या कळसाला कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला टेकऊन मढीच्या यात्रेला प्रारंभ होतो. ही परंपरा वर्षानुवर्षे आजही चालू आहे भाविकांकडून मंदिरावर रेवड्यांची उधळण केली जाते. भाविक भक्त नाथांच्या समाधीला गलफ (वस्त्र), पुष्पहार, दवना, सुगंधी अत्तर, रेवडी आणि मलिद्याचा (चपाती, गूळ, तूप व बडिशोप एकत्र केलेला) प्रसाद अर्पण करतात. यावेळी नाथांच्या जयजयकाराने व डफ ढोल-ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमुन जातो.नाथ संप्रदाय ही सुद्धा अध्यात्मिक साधनेचे एक धार्मिक अधिष्ठान आहे व या अधिष्ठानांचा बहुमान श्री क्षेत्र मढी कानिफनाथ महाराज यांच्या रूपाने आपल्या कैकाडी समाजाला मिळाला आहे.नांदेड कैकाडी मानकरी मंडळा तर्फे नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांना मा. नगर सेवक सुनील जाधव यांनी या वर्षी जास्तीत जास्त संख्येने मढी येथे येण्याचे आवाहन केले आहे.अशी माहिती प्रा. डॉ. महेश जाधव यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या