🌟लोकसभा निवडणूक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 21 लाखांवर बनावट विदेशी मद्यसाठा जप्त.....!

🌟या कालावधीत सराईत गुन्हेगाराच्या विरोधात 9  प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत🌟

परभणी (दि.21 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, परभणी यांनी मार्च ते दि. 19 एप्रिल पर्यंत  केलेल्या कारवाईत 21 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत एकुण 112 गुन्हे उघडकीस आणले असुन, यात एकुण 113 आरोपी विरुध्द कार्यवाही केली आहे. या गुन्ह्यात एकुण 221 लिटर हातभट्टी गावठी दारु, 1,650 लिटर गावठी दारुचे रसायन, 50 लिटर ताडी, 680 लिटर देशी दारु, 88 लिटर विदेशी दारु, 212 लिटर परराज्यातील विदेशी मद्य, तसेच बनावट लेबल 1,260 दारूसह 2 चारचाकी वाहन तसेच 7 दुचाकी वाहने असा एकुण 21 लाख 75 हजार 680 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कालावधीत सराईत गुन्हेगारांविरुध्द 9  प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक प्रकरणात 9 आरोपींन विरुध्द 9 लाख रुपयचे (प्रत्येकी एक लाख रुपयेच) बंधपत्र घेण्यात आले आहेत, तसेच एक सराईत गुन्हेगार विरुध्द एमपीडीए कायद्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या स्थानबध्दतेच्या आदेशानुसार आरोपीस छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे.

या कारवाईत सराईत गुन्हेगाराना फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 149 प्रमाणे एकुण 42 नोटीसा बजाविण्यात आल्या असुन, आंतरराज्य मद्य तस्करांना उप विभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत 107 प्रमाणे एकुण 7 सराईत गुन्हेगारांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकुण 7 ठोक विक्री देशी दारु अनुज्ञप्तीवर सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यामार्फत नजर ठेवली जात आहे. तसेच किरकोळ विक्री अनुज्ञप्तीच्या दैनंदिन मद्य विक्रीवर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी- कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.

परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती बुधवार, दि. 24 एप्रिल, 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासुन मतदान दि. 26 एप्रिल, 2024 रोजी पुर्ण दिवस असे एकुण तीन दिवस कोरडा दिवस घोषीत करण्यात आले आहेत. तसेच मंगळवार दि. 4 जून, 2024 रोजी मतमोजणीचा दिवस देखील कोरडा दिवस घोषीत करण्यात आला आहे.

तरी कोणीही अवैध मद्य खरेदी करु नये, तसेच जिल्हयात अवैध मद्य, बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगुन असेल किंवा विक्री करीत असेल तर याची माहिती या विभागास देण्यात यावी. या विभागाचा टोल फ्री क्र. 18002339999 व व्हॉटस अप क्र.8422001133 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्‍क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे...... 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या