🌟अजूनही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत🌟
नांदेड (दि.26 एप्रिल) :- 16-नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आज 26 एप्रिल, 2024 रोजी मतदान सकाळी 7 वाजेपासून सुरु झाले आहे. 16 नांदेड लोकसभा मतदार संघासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.47 टक्के मतदान झाले आहे.
16-नांदेड लोकसभा मतदार संघात शहरी व ग्रामीण भागात सकाळपासून मतदान उत्साहात सुरु आहे. यामध्ये भोकर 53.38 टक्के, नांदेड उत्तर 52.35 टक्के, नांदेड दक्षिण 52.48, नायगाव 55.08, देगलूर 51.45 टक्के आणि मुखेड 50.09 टक्के असे एकूण 52.47 टक्के मतदान झाले आहे तर नायगांव मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यत सर्वाधिक 55.08 टक्के मतदान झाले आहे. अजूनही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत आहे....
00000
0 टिप्पण्या