🌟राज्याचे माजी मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे मा.खासदार ॲड.गणेशराव दुधगावकर यांचे खळबळजनक विधान🌟
परभणी : परभणी लोकसभेच्या या सार्वत्रिक निवडणूकीत प्रमुख राजकीय पक्षांसह उमेदवारांनी सुरु केलेले जाती-पातीचे राजकारण अत्यंत घातक आहे असे खळबळजनक विधान ज्येष्ठ नेते माजी मंत्री व जिल्ह्याचे मा.खा.अॅड.गणेशराव दुधगांवकर यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ॲड.गणेशराव दुधगावकर यांनी पत्रकारांशी बोलतांना या पध्दतीच्या निवडणूका आपण आपल्या राजकीय आयुष्यात कधी पाहिल्या नाहीत. या निवडणूकीत अक्षरशः जाती-पातींचे गलिच्छ असे राजकारण सुरु आहे. त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद, ताण-तणाव आणि दरी निर्माण होत आहे. याबाबी अत्यंत घातक अशा आहेत, असे नमूद करीत दुधगांवकर यांनी या जिल्ह्यात प्रत्येक निवडणूकीत विविध जाती,धर्माच्या पुढार्यांना आजपर्यंत प्रतिनिधीत्व मिळाले आहे, याची आठवण करुन दिली. या निवडणूकीतील महाविकास आघाडीकडून उभे असलेले उमेदवार संजय जाधव यांनी गेल्या दहा वर्षात संसदेत जावून काय कार्य केले ? असा प्रश्न पडतो असे नमूद करीत जाधव हे सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत अशी टिका देखील दुधगावकर यांनी केली महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे चांगले नेतृत्व आहेत, परंतु या जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे काहीही अस्तित्व नाही केवळ जातीच्या आधारावर ते भवितव्य आजमावू इच्छित आहेत असे ते म्हणाले आपण समीर दुधगांवकर यास निवडणूकीच्या या रिंगणात आवर्जून उतरविले आहे. जिल्ह्याच्या अस्मितेसाठीच स्थानिक उमेदवार व भूमीपूत्र म्हणून समीर दुधगांवकर यांना निश्चितच सर्वसामान्य मतदार पसंत करतील भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्वासही दुधगावकर यांनी व्यक्त केला.....
0 टिप्पण्या