🌟लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ३३ व्या विचारमंथन मेळाव्यात कर्करोगावर मार्गदर्शन🌟
🌟सैन्यदल हवालदार किशोर अडागळे,डॉ.देवानंद देशमुख,राजकुमार अग्रवाल,संतोष देशमुख व अतिथींचे सन्मान🌟
अकोला :- प्रदुषण टाळून उचित जीवनशैली,योग्य वेळी तपासण्या आणि अचुक निदान योग्य उचारात सक्षम असणाऱ्या तज्ञांच्या मार्दर्शनाचे पालन केल्याने जीवनशैलीतील चुका आणि अनुवंशिकतेतून आक्रमण करणारा कर्करोग हा टाळता येऊ शकतो. असे प्रतिपादन अकोला येथील सुप्रसिध्द जनरल व कर्करोग तज्ञ, रामचंद्र हॉस्पिटलचे संचालक डॉ.देवानंदजी देशमुख यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा हा नियमित ३३ वा व व्दितीय संघटन अभियानातील ६ वा मासिक विचारमंथन व स्नेह मिलन मेळावा होता.तो स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये संपन्न झाला.त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण मित्र,समाजसेवी विवेक पारसकर होते.
याप्रसंगी सर्वप्रथम संघटनेचे सामाजिक अधिष्ठाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांना वंदन,अभिवादन करण्यात आले. शहिद जवान,वझेगावचे श्रीकृष्ण माळी व अपघात आणि आपत्तीग्रस्त बळींना श्रध्दांजली वाहण्यात आली कर्करोगात स्रियांमध्ये होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण भारतात आणि जगातही सर्वाधिक आहे.हा पुरूषांमध्ये सुध्दा बळावतांना दिसतो आहे. ईतर प्रकारच्या कर्करोगांमध्ये देशामध्ये पंजाब हे राज्य अग्रेसर आहे,तिथे कॅन्सर नावाने कॅन्सर रेल्वे गाडी आहे.अन्नद्रव्यामध्ये कॅलरीज आणि फायबर यांचे योग्य संतुलन असले पाहिजे.गुटखे,सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळण्याचे प्रयत्न, कर्करोगाचे महिलांमधील प्रमाण कमी करण्यासाठी योग्य वयात लग्न आणि योग्यवेळी अपत्य ह्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे.असेही याबाबत दक्षता म्हणून त्यांनी सांगितले. यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर), राष्ट्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख, सुप्रसिध्द साहित्यिक,कवी सुरेशजी पाचकवडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
सैन्यदलाच्या शौर्याचा अभिमान, तथा सामाजिक बांधिलकीने जगणाऱ्या विविध क्षेत्रातील सन्मान प्राप्त अग्रेसर मान्यवरांचा सत्काररूपी प्रोत्साहनाने सकारात्मक उर्जा देण्याचे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे उपक्रम असतात.त्यानुसार दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे शौर्य गाजवणाऱ्या राष्ट्रपतींच्या दोन पदकांचे व ईतर सन्मानाचे मानकरी,कळंबेश्वर रहिवाशी किशोर अडागळे,सापडलेले लाखो रूपये किंमतीचे सोने परत करणारे व्यावसायिक राजकुमार अग्रवाल आणि कामगार आयुक्त सहाय्यक व शॉप अॕक्ट निरिक्षक म्हणून योग्य सहकार्याने उद्योजक,श्रमिक कामगारांना सहकार्य देऊन समाजातून भावनिक शुभेच्छा प्राप्त करणारे संतोष देशमुख व अतिथींचे सन्मानपत्र,शाल,पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.जवान किशोर अडागळे यांनी दहशतवादी खात्म्याच्या थरारक मोहिमेची कहाणी उपस्थितांसमोर मांडली प्रास्ताविक भाषणातून संजय देशमुख यांनी संघटनेच्या सामाजिक आणि पत्रकार कल्याण तथा हक्क प्राप्तीच्या सक्रीय संघर्षक वाटचालीची माहिती दिली.सत्कारमुर्ती व अतिथींनी आपली मनोगते व्यक्त केली. पर्यावरण मित्र विवेकजी पारसकर यांनी संघटनेची वाटचाल आणि प्रगतीला अध्यक्षिय भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या. डिजीटल व प्रिन्ट मिडीया पत्रकार,सुत्रसंचालिका सौ.जया भारती इंगोले यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.
याप्रसंगी लोक स्वातंत्र्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार प्रदिपजी खाडे,मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराज गावंडे,प्रा.डॉ.संतोषजी हूशे,ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.राजाभाऊ देशमुख,अंबादास तल्हार हे केन्द्रीय पदाधिकारी , तथा डॉ.विनय तांदळे, डॉ.शंकरराव सांगळे,हे विभागीय पदाधिकारी आणि न्यायाधिश नितीनजी अग्रवाल, प्रा.मोहन काळे, प्रा.विजय काटे,नानासाहेब देशमुख,ज्येष्ठ पत्रकार दिपक देशपांडे पंजाबराव वर,यश न्यूज चॅनेल चे यश अग्रवाल, विदर्भ न्यूज ३६५ अमरावतीचे सुनिल भोळे,पत्रकार अविनाश भगत,के.व्ही.देशमुख, यांची प्रामुख्याने उपस्थित होती. सागर लोडम,अकोला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण), मनोज देशमुख,जिल्हा संघटीका सौ.दिपाली बाहेकर, सहसचिव मनोहर मोहोड, सतिश देशमुख,(निंबेकर) राजाभाऊ देशमुख (रामतिरथकर) शामबाप्पू देशमुख (आकाशवाणी) सुनिल अग्रवाल,अनिलकुमार अग्रवाल, दिलीप नवले, अॕड.संकेत देशमुख,सि.ए.गौतम अग्रवाल, गिरीश अग्रवाल,धारेराव देशमुख, डॉ.अशोक सिरसाट, वसंतराव देशमुख,देवीदास घोरळ, गजानन मुऱ्हे,गौरव देशमुख,सतिश देशमुख (उगवेकर) शामभाऊ कुलकर्णी, पि.एस.देशमुख, पि.एल.जामोदे,आकाश हरणे,कृष्णाभाऊ चव्हाण,गजानन चव्हाण, दर्शन इंगळे, अजय सिरसाठ,ईश्वर अडागळे, व ईतर पत्रकार आणि स्नेहीजणांची भरगच्च उपस्थिती होती.राष्ट्रीय सचिव राजेन्द्र बाप्पू देशमुख यांनी आभारप्रदर्शन करून सहभोजनानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले......
0 टिप्पण्या