🌟बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील तहसिलदार सचिन जैस्वालच्या बंगल्यातून चक्क ०९ लाख ५० हजार रुपये जप्त...!



🌟सचिन जैस्वाल याची परभणीतील एक टोलेजंग इमारतही करण्यात आली सील🌟


बुलढाणा : विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथील तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी सचिन शंकरराव जैस्वाल वय ४३ वर्याष या महसूल प्रशासनातील लाचखोर वरिष्ठ अधिकाऱी जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्याकरीता ३५ हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या कचाट्यात सापडला त्याला ताब्यात घेल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने जैस्वाल याच्या परभणी येथील बंगल्यातून ०९ लाख ४० हजार रुपयांची नगदी रक्कम तर जप्त केलीच याशिवाय त्याची वरकमाईतून उभारलेली चार मजली अलिशान इमारत देखील पथकाने सिल केल्याने शासकीय नौकरशहांच्या लाचखोर लॉबीत अक्षरशः खळबळ माजली आहे.

        बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील एका व्यक्तीने लाचखोर तहसीलदार जैस्वाल याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे या खात्याच्या पथकाने वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्याकरीता ३५ हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी तहसीलदार जैस्वाल, त्याचे चालक मंगेल कुलथे, शिपाई पंजाबराव ताटे यांनाही ताब्यात घेतले. या तिघांविरोधात बुलढाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, अनिरुध्द कुलकर्णी, सीमा चाटे, संतोष बेदरे, कल्याण नागरगोजे, अतूल कदम, जे.जे. कदम, अनिल नरवाडे यांच्या पथकाने जैस्वाल याच्या परभणीतील मंगलमूर्ती बंगल्याची झडती घेतली तेव्हा ०९ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच चार मजली इमारतही सील करण्यात आली. दरम्यान, या कारवाईने  शासकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या