🌟वाशिमच्या जिल्हाधिकारी टाळ वाजवी....सिईओंच्या हाती खंजिरी....मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी....!


🌟अधिकारी व कर्मचारी यांचे मताधिकार जाणीव जागृती करीता मानवी साखळी तथा रॅलीचे करण्यात आले होते आयोजन🌟 


फुलचंद भगत

वाशिम :- मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मताधिकार जाणीव जागृती करीता मानवी साखळी तथा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.



   या रॅलीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव,स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी निलेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्थानिक लोककलावंतांनी मतदार जनजागृती गीत गाऊन जनजागृती केली. रॅलीमध्ये बाकलीवाल शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थीनींसह महसूल विभाग, जिल्हा परिषद , नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या