🌟संत भायजी महाराज तिथक्षेत्रावर जनसागर उसळला🌟
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तिर्थक्षेत्र पिंपळखुटा संगम येथे श्रीराम नवमी उत्सवाानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा लाभ लाखावर भाविकांनी घेतला आहे. १३३ व्या संत भायजी महाराज यांच्या यात्रा उत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक दाखल झाले होते. त्यामुळे अडाण मडाण नद्यांचा परिसर श्रीरामचंद्र प्रभुंच्या जयघोषाने दणाणुन गेला होता.संत भायजी महाराजांनी १३३ वर्षा पुर्वी अडाण मडाण नद्यांच्या संगमावर रामनवमी निमीत्त यात्रा उत्सव सुरु केला आहे. दरवर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत साजर्या होणार्या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
यावर्षी यावर्षी १० एप्रिल ते बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ‘राम कृष्ण विठ्ठल हरि नारायण’ नामाचा अखंड जयघोष करण्यात आला आहे.बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता काकड व मंदीर प्रदक्षिणा, सकाळी ८ वाजता मृती व समाधी पुजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई यांचा गायनाचा कार्यक्रम, ११ वाजता पद्माकर तर्हाळकर यांच्या उपस्थितीत राम तऱ्हाळकर अकोला यांच्या सुमधूर वाणीतून वाणीतून श्रीराम कथा प्रवचन व दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता गोविंद महाराज प्रदक्षिणा व दहीहांडी कार्यक्रम झाला. आणि दुपारी ४.३० वाजतापासून हभप प्रकाश महाराज पिंपळखुटा, वैराग्यमूर्ती आकाशपुरी महाराज व हभप संजयनाथ महाराज जाधव अकोला यांच्या उपस्थितीत भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.
गुरुवार १८ एप्रिल ते मंगळवार २३ एप्रिल दरम्यान ह.भ.प. प्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत भायजी महाराज ग्रंथ पारायण करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता मिरवणूक व दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सेवेसाठी चढाओढ :-
एरव्ही सार्वजनिक कार्यक्रमाच्या कामासाठी माणसे मिळत नाहीत, अशी ओरड असते. मात्र पिंपळखुटा संगम येथील यात्रा उत्सवात प्रत्येक काम करण्यासाठी भाविकात चढाओढ असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे स्वयंपाक तयार करणे व महाप्रसाद वाढण्यासाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट सेवकरी हजर होते, हे विशेष.
* महिलांना पहीला मान :-
कुठल्या कामासाठी किंवा महाप्रसादात पुरुषांना पहीले प्रधान्य असते. मात्र, पिंपळखुटा संगम महीलांना पहील्यांदा महाप्रसाद वितरीत करण्यात येतो. ही भायजी महाराजांनी घालुन दिलेली १३३ वर्षाची परंपरा आजही जशीच्या तशीत सुरु आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या