🌟देवस्थानाची १५० वर्षांची परंपरा ; हजारो भाविकांनी घेतला खिर व हुलपल्लीचा महाप्रसाद🌟
पुर्णा (दि.१५ एप्रिल) :- लिंगायत समाजातील श्रीसंत, येथील ग्रामदैवत श्रीगुरुबुद्धीस्वामी यांच्या पाडवा यात्रा महोत्सवाची सांगता शुक्रवारी २४ रोजी श्रींच्या भव्य दिमाखदार पालखी सोहळ्याने करण्यात करण्यात आली.यावेळी शहर व परिसरातील हजारों भक्तगणुंनी मानाच्या खिर व हुलपल्लीचा महाप्रसादाचा लाभ घेतला.
पूर्णा शहरातील ग्रामदैवत श्री गुरुबुद्धीस्वामी मंठसंस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.3एप्रिल पासून पाडवा यात्रा महोस्तवाचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे १५० वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा महोस्तवादरम्यान दैनंदिन ग्रंथराज परमरहस्य पारायण, शिवमहापुराण कथा ,शिवपाठ, रुद्राभिषेक, गाथा भजन, शिवकीर्तन अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दि 11एप्रिल रोजी डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे प्रसादाचे किर्तन पार पडले यावेळी मानाच्या हुलपल्ली व खिरीच्या भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.महाप्रसादाचा हजारों भाविकांनी लाभ घेतला.श्रींच्या मुर्ती विधीवत पुजा आरती करुन पालखीत विराजमान करण्यात आल्या.पालखी सोहळ्यात दर्शनी नंदिवर विराजमान गुरुबुद्धी स्वामी यांचे गुरु श्रीनुन्न्ड्डेश्वर महाराज यांची मुर्ती तर आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीतून श्री गुरुबुद्धीस्वामींची मुर्ती तर मठाधिश डॉ.शिवाचार्य महास्वामी यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली.रात्री १० वाजण्याच्या सुमारास येथील मठसंस्थान येथून गणपती मंदिर, महादेव मंदिर,सराफा बाजार, दत्त मंदिर मार्गावर रंगलेला श्रींचा भव्य दिमाखदार पालखी सोहळा ''गुरूराज माऊलीच्या" जयघोषात मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.पालखी सोहळ्यादरम्यान येथिल शेंकडों महीलांनी आप आपल्या घरासमोर रांगोळ्याची आरास करून श्रींची आरती पुजा केली.संतश्रेष्ठ श्री गुरू बुद्धीस्वामी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी विविध जाती-धर्माचे भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यात्रा यशस्वीतेसाठी महोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
🌟'प्रसिद्ध खिर व हुलपल्ली'
या यात्रेत प्रसिद्ध असलेली हूलपल्ली बनविण्यासाठी हरबऱ्याचे पिठ ,हरभरा दाळ ,चिंच ,शेंगदाणा,लाल मिरची,तेजपान, धने पूड,तेल,गुळ,वेलची, यांच्या मिश्रणाचा प्रामूख्याने वापर केल्या जातो.तर नवीन आवक झालेल्या तब्बल १० ते १२ क्विंटल गव्हाची खिर बनविण्यासाठी गुळ, विलायची ,बडीसोप,खसखस,मिरेपूड, खोबरं, तांदूळ,तुप यांचा मुख्यत: वापर केला जातो मोठ्या कढईत ती तयार केली जाते. हि खिर बनवण्याचा मान येथील समाजातील पळसकर वाड्याला आहे.तेथील वयोवृद्ध व तरूण मिळून लज्जतदार गव्हाची खिर बनवितात......
पूर्णा: पालखीत विराजमान श्रींची मुर्ती..
0 टिप्पण्या