गंगाखेड : गंगाखेड शहरातील १९ वर्षीय युवतीने ब्लॅकमेलींगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना गंगाखेड शहरात घडली. या प्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. या आरोपीस तातडीने जेरबंद करून या सर्वांना तात्काळ कठोर शिक्षा करावी अशी मागणी आज शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात आली.
शहरातील व्यंकटेश विद्यालयात श्रद्धांजली निषेध सभा घेण्यात आली. पिडीत कुटुंबीयांच्या सोबत सर्वजन असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने कडक पावले ऊचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली महिला दक्षता समिती, सवंगडी कट्टा सामाजिक समूह, व्यापारी महासंघ, लॉयन्स क्लब गोल्डसिटी, लॉयन्स क्लब टाऊन, साई सेवा प्रतिष्ठान, लोक जनशक्ती सामजिक संघटना, संघर्ष प्रतिष्ठान, गोदावरी स्वच्छता अभियान, पतंजली योग समिती, बी.के.सी.ट्रस्ट, नाभिक महामंडळ, रक्षक फाउंडेशन, रुद्राक्ष मित्रमंडळ, स्वामी विवेकानंद मित्रमंडळ, मन्नाथ सेवा ट्रस्ट, गंगाखेड तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र युनियन ऑफ जर्नालिस्ट संघटना, सकल ब्राम्हण समाज गंगाखेड आदी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी याप्रसंगी ऊपस्थित होते.
गंगाखेड पोलीसांना निवेदन देत कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब राखे, दगडूसेठ सोमाणी, गोविंद यादव, मनोज नाव्हेकर, माधुरी बंटीराजे राजेंद्र, संजय अनावडे, भगत सुरवसे, ॲड राजू देशमुख, महेश साळापूरीकर, संगीता घाडगे, राजेश जाधव, संदिप कोटलवार, गजानन दिवाण, ऊमेश पापडू, नारायण घनवटे, अमोल दिवाण, सुनिल कोनार्डे, शशी धोंडरकर, ईश्त्याक अन्सारी आदिंची ऊपस्थिती होती......
0 टिप्पण्या