🌟राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भदंत डॉ. उपगुप्त महाथरो यांनी निवेदनाद्वारे केली मागणी🌟
परभणी/पुर्णा : परभणी जिल्ह्यात सर्वत्र महामानव विश्वरत्न बोधीसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत साजरी करण्यात आली जयंती साजरी होत असतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा अनुचित प्रकार जिल्ह्यात कुठेही कार्यकर्त्यांकडून झाला नाही सर्वत्र मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होईल,सामाजिक कलह निर्माण होईल असा कोणताही प्रकार घडला नाही.
परभणी जिल्ह्यात अतीसंवेदनशील शहर म्हणून ठपका लागलेल्या पुर्णा शहरात देखील सार्वजनिक भिम जयंती महोत्सव मिरवणुक अत्यंत शांततेत पार पडली परंतु कोणत्याही सुजाण नागरिकाने कोणत्याही स्वरूपाची तक्रार पोलिसात केलेली नसतांना सुद्धा पूर्णा पोलिस प्रशासनाने त्यांच्या मार्फत स्वतः होऊन सार्वजनिक भिम जयंती मंडळाचे अध्यक्ष पूज्य.भदंत बोधी धम्मा आणि जयंती मंडळाचे अन्य पदाधिकारी यांचे विरुद्ध भादवि.१८८ व म.पो.ॲक्ट १३५ चे उल्लंघन केल्याचे नमूद करून दि.१५ एप्रिल २०२४ रोजी खोटे गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे पोलिसांना नेहमी सहकार्य करणाऱ्या व शांतता समितीच्या कार्यकर्त्यांवर देखील पुर्णा पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांचा अपमान केला आहे.म्हणून बौद्ध समाजाचे धर्मगुरू तथा अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे जयंती मंडळावर केलेले खोटे गुन्हे रद्द करावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज शुक्रवार दि.१९ एप्रिल २०२४ रोजी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी असे नमूद केले आहे की पुर्णा पोलिसांच्या या कृत्यामुळे जयंती आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणाऱ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.पोलिसांची ही कृती योग्य नसल्याची खंत देखील भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद करून जिल्ह्यातील व पुर्णेतील जयंती मंडळावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्याची आग्रही मागणी केली असून या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार संजय बनसोडे,जिल्हाधिकारी परभणी,विभागीय पोलिस आयुक्त,परिक्षेत्र नांदेड,पोलीस अधीक्षक परभणी यांच्याकडे देखील पाठविल्या आहेत.....
0 टिप्पण्या