🌟स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ०३.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त🌟
फुलचंद भगत
वाशिम:-नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांनी दिले आहेत.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतून महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा ३,५१,६४४/- रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. दि.०७.०४.२०२४ रोजी रात्री कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतील ग्राम शेलूबाजार येथे ०२ व ग्राम लाठी येथे एका ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता नजर, विमल, वाह, ताज असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला अवैधपणे साठवलेला मिळून आला. सदर प्रकरणी ०३ आरोपींकडून एकूण ३,५१,६४४/- रुपयांचा गुटखा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींवर पो.स्टे.मंगरूळपीर येथे कलम १८८, २७३, ३२८ भादंवि सहकलम ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, १९५९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अवैध धंद्यांविरुद्धचे धाडसत्र यापुढे देखील असेच सुरु राहणार आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.रमाकांत खंदारे, पोहवा.दिपक सोनवणे, अमोल इंगोले, पोना.प्रविण राउत, पोकॉ.विठ्ठल सुर्वे, मपोकॉ.तेजस्विनी खोडके, चापोकॉ.संदिप डाखोरे यांनी पार पाडली. सर्व जनतेने सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या