🌟मानवत येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त मोटरसायकल रॅली संपन्न....!


🌟मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन लोकनेते विजय वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले🌟


मानवत (दि.११ एप्रिल): क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने  गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन लोकनेते विजय वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे,सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजू खरात, अंनत भदरगे, ईश्वर घाटूळ, रवी पंडित, विशाल थापसे, महेंद्र ठेंगे, चंद्रकांत मगर, जनार्दन कीर्तने, संपत पंडीत राहुल डाके, छगन भदरगे, सत्यशील धबडगे,बाबासाहेब सोनटक्के, नंदू कुमावत, मुरली ठोंबरे आदी उपस्थित होते.  शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर  नगर येथून  दुपारी बारा मोटर सायकल रॅली ला सुरुवात करण्यात आली. मोटरसायकल रॅली गजानन महाराज मंदिर, नवा मोंढा पंचशील नगर, संत जगनाडे महाराज चौक, नगरपरिषद  कार्यालय, कडतण गल्ली, बुद्ध नगर, पेठ मोहल्ला मंत्री गल्ली, कापड मार्केट चौक पोलीस ठाणे मार्गे  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी विजय वाकोडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संपत पंडित  प्रस्ताविक अनंत भदर्गे, तर आभार राजू खरात आणि सोमदत्त भदर्गे यांनी मानले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या