🌟विषय तज्ज्ञ तथा अभ्यासू वक्ते अनिल ढाले यांचे प्रतिपादन🌟
पुर्णा (दि.०१ मे २०२४) : शैक्षणिक तंत्रज्ञान आत्मसात करून डिजिटल दुनियेत आपले विद्यार्थी स्मार्ट कसे बनतील याकरिता शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्ययन प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी तन मन धनाने योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन गटसाधन केंद्र पूर्णा येथील विषय तज्ज्ञ तथा अभ्यासू वक्ते अनिल ढाले यांनी व्यक्त केले ते तालुक्यातील धनगर टाकळी येथील केंद्रिय प्राथमिक शाळेत आयोजित शैक्षणिक सत्रातील अंतिम शिक्षण परिषदेत बोलत होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख उमाकांत देशटवार , प्रमुख उपस्थिती उच्चश्रेणी मुख्याध्यापक विठ्ठल रिठ्ठे केंद्रिय मुख्याध्यापक गुरुदास धनरवार यांची उपस्थिती होती शिक्षण परिषदेत प्रमुख सुलभक मारोती कदम , दत्ता राऊत , दीपक डोणगावकर यांनी विषय निहाय उपक्रम आणि उन्हाळी सुट्टीतील ऑनलाईन स्वाध्याय यावर सविस्तर विवेचन केले . शिक्षण परिषदांचे महत्व आणि वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमांचा चढता आढावा सादर करून सर्व शिक्षकांचे कौतुक केले .या शिक्षण परिषदेची सुरुवात स्त्री शिक्षणाचा ध्यास आणि वसा घेणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले . परिषदेसाठी विषयतज्ञ श्री . अनिल ढाले सर, केंद्रप्रमुख श्री . उमाकांत देशटवार सर, केंद्रीय मुख्याध्यापक श्री . गुरुदास धनरवार सर, केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका उपास्थित होते.
केंद्रप्रमुख श्री.उमाकांत देशटवार यांनी अध्ययन निष्पत्ती, गुणवत्ता वाढ, विविध शैक्षणिक व शारीरिक स्पर्धा परीक्षा यातील विशेष प्रगतीविषयीचा चढता आढावा सादर केला विषयतज्ञ श्री . अनिल ढाले सर यांनी केंद्रातील शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले . शिक्षण महर्षी श्री . धोंडो केशव कर्वे यांच्या उदाहरणाने सर्व सहभागी शिक्षकांना प्रेरीत केले. सर्वांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले सुलभक श्री दत्ता राऊत यांनी उपस्थित शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीतील व पुढील शैक्षणिक वर्षीतील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी नियोजन कसे असावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सुलभक श्री.मारोती कदम सर यांनी उन्हाळी सुट्टीतील नियोजन कसे असावे हे विषयवार तपशिलाने मार्गदर्शन केले तर श्री.गुरुदास धनरवार यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले श्री.मारोती कदम यांनी सूत्रसंचलन केले.शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी केंद्रिय मुख्याध्यापक गुरुदास धनरवार , चंद्रकांत शेळके , सोनाजी कोमटवार , मनोज राठोड गणेश मटकमवाड , सतिश पतंगे , रबिया बेग आदींनी परिश्रम घेतले . परिषदेस केंद्राअंतर्गत मुख्याध्यापक , प्राथमिक शिक्षक , पदविधर शिक्षक , शिक्षिका उपस्थित होते . हम होंगे कामयाब एक दिन..या प्रेरणादायी गिताने परिषदेची यशस्वी सांगता झाली....
🎉🌹💫✨🎊
0 टिप्पण्या