🌟महाराष्ट्र राज्य वर्धापण दिनी परभणी जिल्हा पोलीस दलातील सात अधिकारी/कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह....!


🌟परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सन्मानचिन्ह प्रदान🌟 

परभणी (दि.०१ मे २०२४) - परभणी जिल्हा पोलिस दलात कार्यरत राहून अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्हा पोलिस दलातील सात अधिकारी/कर्मचाऱ्यांना आज बुधवार दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याच्या ६४ व्या वर्धापण दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक दिपककुमार चुडामनराव वाघमारे,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शेख महेबुब शेख महेमुद,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब शेख जिलानी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव विठोबा जारकंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार नामदेव शिसोदे,पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनेश मन्मथ स्वामी,पोलीस नायक राजेश बाबुराव आगाशे यांचा समावेश असून त्यांना सदरील सन्मानचिन्ह परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांच्या शुभहस्ते जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आज बुधवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले असून सातही सन्मान प्राप्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या