🌟युवा प्रबोधन विभागांतर्गत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन🌟
पुर्णा (दि.०४ एप्रिल) - पुर्णा शहरातील अमृतनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात आयोजन दि.०६ मे २०२४ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेच्या दरम्यान युवा प्रबोधन विभागांतर्गत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीसह भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या वतीने प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असते 'रक्तदान करुया एक पुण्यकर्म करुया' असे आवाहन करीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते रक्तदान शिबिरात असंख्य सेवेकरी/रक्तदाते आवर्जून भाग घेऊन पुण्यकर्माचे भागिदार होत असतात याहीवर्षी सोमवार दि.०६ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या सेवेकऱ्यांसह रक्तदात्यांनी मोठ्या सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९९६०९८८४३२,८८०५०६२२१७,९९२१७५०००८,९०९६९१११४३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.......
0 टिप्पण्या