🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरला दवाखाना थाटुन बसला होता 'तो' मुन्नाबाई,अखेर सापडला पोलिसांच्या कचाट्यात......!


🌟मंगरुळपीर येथे झोलाछाप डाॅक्टरवर आरोग्य विभाग व पोलीसांची संयुक्त कारवाई🌟

🌟भगंदर,मुळव्याध ईलाजाच्या नावावर रुग्नांची हजारो रुपये घेवुन करत होते फसवणुक🌟


फुलचंद भगत

मंगरुळपीर:-दि./०६/ २०२४ रोजी एक तक्रारदार इसम मंगरूळपीर जि. वाशिम हे ग्रामीण रूग्णालय मंगरूळपीर येथे आले व त्यांनी तकार अर्ज दिला व सांगितले कि, “मी डॉ ए कुमार यांचे कडे तपासणी केली असता मला त्यांनी शस्त्रक्रिये साठी दहा हजार रूपये खर्च सांगितला व त्यांना मी त्यांची शैक्षणिक डिग्री विचारली असता त्यांनी थातुरमातुर उत्तरे दिली. यावरून ते बोगस असु शकतात आपण सदर प्रकरणाची चौकशी करावी व सदरील बोगस डॉक्टर आढल्यास त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी असे सांगुन विनंती अर्ज दिल्याने मी व सोबत डॉ. श्रीकांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनश्री जाधव तसेच स्टॉफ महेश बारगजे, प्रकाश संगत, दत्ता राठोड, असे साई मंगल कार्यालय जवळ, महल्ले यांचे कॉम्प्लेक्स मध्ये मंगरूळपीर ता. मंगरूळपीर जि. वाशिम येथे दुपारी ०३:३० वाजताचे सुमारास गेलो. सदर ठिकाणी गेलो असता एक बोर्डावर मुळव्याध, भगंदर, फिसार मुळव्याद दवाखाना. पत्ता महिंद्रा फायनान्स जवळ, बस स्टॅन्ड मागे, बायपास रोड, मंगरूळपीर डॉ ए कुमार D.R.MC.P., C.C.A Dilpoma in acupressure Regd.No. 476138 अशा वर्णनाचा बोर्ड असलेला दवाखाना दिसला आम्ही आत मध्ये जावुन सदर ठिकाणी हजर असलेले इसमास त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांने त्यांचे नांव आनादी ठाकुर बिश्वास वय २४ वर्षे रा. ह.मु. शेलुबाजार मुळ रा ग्राम विष्णुपूर ता. चाकदा जि. नदिया राज्य पश्चिम बंगाल असे सांगितले त्यावेळी तकारदार खंडारे यांनी सांगितल कि, याच डॉक्टरांनी त्यास तपासले आहे. अशी माहीती दिल्याने आम्ही सदर इसमास यांचे वैदयकिय डिग्री बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, त्याचे कडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसुन तो मदतनीस म्हणुन नोकरी करतो आहे. व सदर ठिकाणी डॉ. आनंद कुमार विश्वास हे असून त्यांना बोलावून घेतो अशी माहिती दिली. आम्ही सदर ठिकाणी खालील प्रमाणे औषधे व इतर साहित्य मिळून आले. १). त्रिफल चूर्ण २). PILE free Capsul प्रत्येकी दोन कॅप्सुलचे पाच बॉक्स ३) एक डेटॉल बॉटल ६० एमएल ४). एक पॅराशुट तेल बाटली ४० एमएल ५ ) Pileseal Capsule एक खोललेली डबी ६) एका स्टीलचे डबी मध्ये पांढरे रंगाचे किम अर्धवट वापरलेली ७) एक कात्री ८) एक अर्धवट कॉटन बंडल ९) तीन सिरिंज बिना सुईची असे साहित्य मिळुन आले. यातील डॉ. आनंद कुमार विश्वास हे आलेनंतर त्यांनी त्यांचे नांव डॉ. आनंद कुमार विश्वास वय ३७ वर्षे धंदा डॉक्टर रा ह.मु. शेलुबाजार ता. मंगरूळपीर जि. वाशिम मुळ रा. ग्राम विष्णुपूर ता. चाकदा जि. नदिया राज्य पश्चिम बंगाल, असे सागितले त्यांना आम्ही त्यांचे शैक्षणिक व वैदयकीय प्रमाणपत्रा बाबत विचारणा केली असता त्यांचे कडे १. BHARAT SEVAK SAMAJ, National Development Agency, Established in 1952 by Planning commission Government of India 2- ACUPRESSURE RESEARCH, TRAINING AND TREATMENT INSTITUTE, JODHPUR RAJASTHAN 3- Kerala Ayurveda paramparya Vaidya Forum- 4. BHARAT SEVAK SAMAJ, Central Board of Examination, statement of Marks First year- 5. BHARAT SEVAK SAMAJ Central Board of Examination, statement of Marks Second year. 6. BHARAT SEVAK SAMAJ, Planning commission च्या गाईड लाईन्स बाबतच्या झेरॉक्स असे प्रमाणपत्र आढळून आले. सदरचे प्रमाणपत्र तपासणी ताब्यात घेतले. तसेच सदरचे दवाखाना तपासणी मध्ये वरील प्रमाणे आयुवेर्दीक औषधे गिळुन आले. ते त्यांना शासकिय नियमानुसार वापरता येत नाही. तसेच त्यांना दवाखाना चालविण्याबाबत प्रमाणपत्र मागितले असता त्यांचे कडे मिळुन आले नाहीत. वरील सर्व साहित्य व प्रमाणपत्र दोन पंचासमक्ष जप्त करून सिलबंद करण्यात आले. तरी यातील वरील इसमांनी संगणमत करून त्यांना शासकिय नियमानुसार वापरता येत नाही असे आयुवेर्दीक औषधे यांचा वापर करून कोणत्याही प्रकरची शासकिय परवानगी नसताना वैदयक व्यावसाय करून लोकांची फसवणुक करतांना मिळुन आले. म्हणुन माझी त्यांचे विरूध्द भा.द.वि कलम २७६ ४१९, ३४ सह कलम ३२, ३३ (२) महाराष्ट्र वैदयक व्यवसायी अधि. २००० प्रमाणे कायदेशीर तकार मंगरूळपीर पोलिस स्टेशनला दिली त्यानुसार पोलीस प्रशासन कुठल्या प्रकारची कायदेशीर कठोर कारवाई करते याकडे मंगरुळपीर तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या