🌟असे आवाहन प्राचार्य शासकिय तंत्रनिकेतन जिंतूर तथा सदस्य सचिव अल्पसंख्यांक मुलींचे शासकिय वसतीगृह यांनी केले🌟
परभणी (दि.23 जुलै 2024) :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता वर्ष 2016 पासून वसतिगृह सुरु करण्यात आले असून, अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह प्रवेशासाठी 2 ऑगसटपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
या वसतिगृहामध्ये 100 मुलींपैकी 70 टक्के अल्पसंख्यांक समुदायातील (मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी) मुलींसाठी तर 30 टक्के जागा बिगर अल्पसंख्यांक मुलींमधून भरण्यात येतात. खुल्या प्रवर्गातील मुलींसाठी प्रवेशाकरिता प्रथम सत्र 2 हजार 850 रुपये इतके निवासी शुल्क आकारण्यात येते. अल्पसंख्यांक मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, अशा मुलींसाठी निवासी शुल्क पूर्णपणे माफ आहे. वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलींना जेवण, नाश्ता इ. खर्च स्वतः भागवावा लागेल. तसेच 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक मुलींना शासनामार्फत दरमहा 3 हजार रुपये मेस भत्ता मिळतो.
वसतिगृहाची सुसज्ज इमारत असून, 100 मुलींच्या राहण्याची उत्तम सोय, सोलार, गिझर व्यवस्था आहे. प्रत्येक विद्यार्थिनीसाठी अद्ययावत फर्निचर, पलंग, गादी, उशी, खुर्ची, स्टडी टेबल, कपाटाची व्यवस्था असून, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टि.व्ही. कॅमेराची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छ व निटनेटकी स्वच्छतागृहाची व्यवस्था असून, सफाई कामगारही नियुक्त आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने 24 तास महिला अधीक्षिका व महिला सुरक्षरक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनी प्रवेशासाठी अधीक्षिका अल्पसंख्यांक मुलींचे शासकिय वसतिगृह जिंतूर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य शासकिय तंत्रनिकेतन जिंतूर तथा सदस्य सचिव अल्पसंख्यांक मुलींचे शासकिय वसतीगृह यांनी केले आहे......
0 टिप्पण्या