🌟नांदेड येथे बँक ऑफ बडोदाच्या 117 व्या स्थापना दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन...!


🌟यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर स.बलवंतसिंघ गाडीवाले यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

नांदेड :- नांदेड येथे बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील बँक ऑफ बडोदाच्या 117 व्या स्थापन दिनानिमित्त नांदेड महानगर पालिका प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माजी महापौर स.बलवंतसिंघ गाडीवाले यांच्या हस्तें शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले 

दरवर्षी आपल्या बँक सर्कल विभागातील जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थी यांना बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून शालेय साहित्याची वाटप केले जाते. तसे त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ मिठाई देऊन शालेय पेन वही सॉक्स दप्तर अशा विविध शैक्षणिक साहित्य देऊन बँक ने सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असते. बँकच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकातून बँक ऑफ बडोदा यांचे विद्यार्थ्यांसह पालक यांच्याकडून कौतुक केले जात आहे.बँक ऑफ बडोदा शिवाजीनगर चे शाखा प्रमुख श्री जितेंद्र मिश्रा सर, श्री विनोद गडप्पा,अमित पेटकर, प्रदीप जगताप,भरत शिंदे आदींची उपस्थिती होती......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या