🌟या परिसंवादात पुणे येथील सुप्रसिध्द विधी अभ्यासक गणेश शिरसाट यांनी केले मार्गदर्शन🌟
परभणी (दि.27 जुलै 2024) : परभणी येथील श्री शिवाजी विधी महाविद्यालय आणि परभणी जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात नवीन फौजदारी कायदे -2023 या विषयावर दि.26 जुलै रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादात पुणे येथील सुप्रसिध्द विधी अभ्यासक गणेश शिरसाट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील अॅड. डी.यु. दराडे यांनीही मनोगत मांडले. या परिसंवादास विद्यार्थी, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश देशमुख आणि वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मंचकराव सोळंके, वकील संघाचे पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चंद्रशेखरराव नखाते, गोविंदराव कदम, मकदुम मोहिउद्दीन, संतोषराव बोबडे, अॅड. दिपकराव देशमुख, अॅड. अशोकराव शिंदे, संतोषराव इंगळे यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. परिसंवादाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ विजय माकणीकर आणि प्रा. डॉ. वसीम खान यांनी काम पाहिले.
0 टिप्पण्या