🌟यावेळी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन : विविध मान्यवर राहणार उपस्थित🌟
परभणी (दि.17 जुलै 2024) : परभणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचार मंचाच्या वतीने याहीवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन रविवारी दि.21 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता जागृती मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत साखरे हे राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर, धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे, परभणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रल्हाद खुणे, गटविकास अधिकारी जयंत गाढे, प्रशिक्षणार्थी जिल्हा शिक्षणाधिकारी विकास कुकडे तसेच धनगर समाजातील इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात यावर्षी दहावीमध्ये 85 टक्केक पेक्षा जास्त व बारावीमध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी, वैद्यकीय प्रवेशपुर्व (नीट) परीक्षेत 550 पेक्षा जास्त गुण, जेईई, आय.आय.टी. एनआयआयटी व सीईटी परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त पसेंटाईल असलेले विद्यार्थी, वर्ग 5 वी व 8 वीतील नवोदय प्रवेश पात्र व स्कॉलरशीप, एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत निवड झालेले विद्यार्थी, स्टेट व नॅशनल स्पर्धेत पात्र खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
सर्व धनगर समाज बांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व आपल्या संपर्कातील पात्र गुणवंत विद्यार्थी, पालक, युवक व शिक्षणप्रेमींनी यावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंचचे अध्यक्ष चंद्रकांत साखरे, सचिव बालाजी कोकणे यांच्यासह सदस्यांनी केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत दिनांक 20 जुलै 2024 पर्यंत जमा करावी, असे आवाहन केले आहे......
0 टिप्पण्या