🌟लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी 25 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.....!


🌟विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते🌟

परभणी (दि.16 जुलै 2024) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी,पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते. तसेच उपलब्ध निधीच्या प्रमाणात ही निवड केली जाते.   

अर्ज सादर करतेवेळी अर्जदाराने सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेला जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्डची छायांकित प्रत, गुणपत्रक, दोन पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईट, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती जोडणे आवश्यक आहे अर्जदाराने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत कारेगाव रोड जिल्हा परभणी येथे 25 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी केले आहे........

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या