🌟विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना देण्यात आली धोक्याची सुचना🌟
नांदेड :- नांदेड येथील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज रविवार दि.२८ जुलै रोजी ९३% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग- ४४४ क्युसेक (१५६८०.०० क्युसेक) १२.३० पि.एम वाजता उघडण्यात येईल.
तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे जीविताची,पशुधनाची,वीटभट्टी साहित्य इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आल्याचे शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन नांदेडचे पुर नियंत्रण अधिकारी यांवी कळवले......
0 टिप्पण्या