🌟गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निवडीस प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती द्या....!


🌟माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार यांचे निर्देश🌟  

परभणी (दि.12 जुलै 2024) : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निवडीस प्रतिबंध कायद्या (पीसीपीएनडीटी) अंतर्गत कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्राविषयी अथवा व्यक्तीविषयी माहिती समूचित प्राधिकाऱ्यांना मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीस त्याने दिलेल्या बातमीची खातरजमा करून व त्या अनुषंगाने संबंधित सोनोग्राफी केंद्रावर अथवा व्यक्तीवर खटला दाखल केल्यावर संबंधित व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 

यामध्ये ती व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी तसेच इतर शासकिय, निमशासकिय अधिकारी - कर्मचारी अशी कोणीही असू शकेल. याबाबतचे बक्षीस राज्यस्तरावर ठेवण्यात आले आहे तसेच एखाद्या जाहिरातीने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत असेल अशा जाहिराती, पुस्तके इत्यादी समुचित प्राधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिल्यास व त्यावर न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यास त्याला योजनेचा लाभ देता येईल.

"प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा असून असे कृत्य होताना आढळल्यास १८००२३३४४७५ या टोल फ्रि क्रमांकावर किंवा http://.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता.  माहिती देणाऱ्यास शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजनेतंर्गत बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या