🌟परभणी जिल्ह्यातील जेष्ठांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी उपलब्ध....!


🌟भारतातील ७३ व राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांपैकी करा एकाची निवड🌟

परभणी (दि.29 जुलै 2024) :- राज्यातील सर्व धर्मियांमधील जेष्ठ नागरिकांना भारतातील 73 व राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांना  भेट देण्याची इच्छा आता शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे पूर्ण करता येणार आहे. जे नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांच्यासाठी भारतातील आणि राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची  व दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

या योजनेतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळांच्या यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येइल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन , निवास इ. सर्व बाबींचा समावेश आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे आवश्यक आहे. वय वर्षे 60 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना लाभ घेता येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.

यात भारतातील तीर्थक्षेत्रे याप्रमाणे आहेत. वैष्णोदेवी मंदिर कटरा, अमरनाथ गुहा मंदिर, सुवर्ण मंदिर अमृतसर, अक्षरधाम मंदिर, श्री दिगबंर जैन लाल मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, बद्रीनाथ मंदिर, गंगोत्री मंदिर उत्तर काशी, केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग, नीलकंठ महादेव मंदिर ऋषीकेश, यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी, वैद्यनाथ धाम देवघर, काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी, इस्कॉन मंदिर वृंदावन, श्रीराम मंदिर अयोध्या, सूर्य मंदिर कोणार्क, जगन्नाथ मंदिर पुरी, लिंगराज मंदिर भुवनेश्वर, मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर, कामाख्यादेवी मंदिर गुवाहाटी, महाबोधी मंदिर गया, रणकपूर मंदिर पाली, अजमेर दर्गा, सोमनाथ मंदीर वेरावळ, द्वारकाधीश मंदिर द्वारका, नागेश्वर मंदीर द्वारका, सांची स्तूप, खजुराहो मंदिर, महाकालेश्वर मंदीर उज्जैन, ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रम्हपुरी, श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम, गोमटेश्वर मंदिर श्रवणबेळगोळ, विरुपाक्षी मंदिर हम्पी, चेन्नकेशव मंदिर बेलूर, अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडू, महाबळेश्वर मंदिर गोकर्ण, भूतनाथ मंदिर बदामी, मुरुडेश्वर मंदिर मुरुडेश्वर, आयहोल दुर्गा मंदिर, श्रीकृष्ण मंदिर उड्डपी, वीर नारायण मंदिर बेलावडी, तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला, मल्लिकार्जून मंदिर श्रीशैलम, बृहदीश्वर मंदिर तंजावर, मीनाक्षी मंदिर मदुराई, रामनाथस्वामी मंदिर रामेश्वरम, कांचीपुरम मंदिर, रंगनाथस्वामी मंदिर त्रिची, अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्नमलाई, कैलासनाथ मंदिर कांचीपुरम, एकंबरेश्वर मंदिर कांचीपुरम, सांरगपाणी मंदिर कुभंकोणम, किनारा मंदिर महाबलीपुरम, मुरुगन मंदिर तिरुचेंदुर, श्री पद्यनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम, गुरुवायुर मंदिर, वडक्कुन्नाथनमंदिर त्रिशुर, पार्थसारथी मंदिर अरनमुला, शबरीमाला मंदिर पथनामथिट्टा, अट्टकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम, श्रीकृष्ण मंदिर गुरुवायुर, थिरुनेल्ली मंदिर वायनाड, वैकोम महादेव मंदिर वर्कला, तिरुवल्ला मंदिर, शिवगिरी मंदिर वर्कला, श्री सम्मेद शिखरजी गिरीडीह, शत्रुंजय हिल, गिरनार, देवगड, पावापुरी, रणकपूर, दिलवाडा टेम्पल, उदयगिरी या तिर्थक्षेत्राचा समावेश आहे.

*राज्यातील तीर्थक्षेत्रे-* मुंबई येथील सिध्दीविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी दादर, माउंट मेरी चर्च वांदे, मुंबादेवी मंदिर, वाळकेश्वर मंदिर मलबार हिल, विश्व विपश्यना पॅगोडा गोराई, चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ कॅवेल, सेंट ॲड्रयू चर्च, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, सीप्झ औद्यागिक क्षेत्र अंधेरी, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ, गोदीजी पार्श्वत मंदिर, नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट, शार हरहमीम सिनेगॉग मस्जिद भंडार, मॅगेने डेव्हिड सिनेगॉग भायखळा, ठाणे जिल्ह्यातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च अग्यारी, अग्निमंदिर तर पुणे जिल्ह्यातील मयुरेश्वर मंदिर मोरगाव, चिंतामणी मंदिर थेऊर, गिरीजात्मज मंदिर लेण्याद्री, महागणपती मंदिर रांजणगाव, खंडोबा मंदिर जेजुरी, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी, भिमाशंकर ज्योतिलिंग मंदिर खेड तालुका, संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहु सोलापूर जिल्ह्यातील संत चोखामेळा समाधी पंढरपूर, संत सावता माळी समाधी मंदिर अरण, ता. माढा, विठोबा मंदिर पंढरपूर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, जैन मंदिर कुंभोज नांदेड जिल्ह्यातील रेणूका देवी मंदिर माहूर, गुरु गोविंदसिंग समाधी, हुजुर साहिब, खंडोबा मंदिर माळेगाव, श्री संत नामदेव महाराज देवस्थान उमरज तालुका कंधार धाराशिव जिल्ह्यातील तुळजा भवानी मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संत एकनाथ समाधी पैठण, घृष्णेश्वर ज्योतिलिंग मंदिर वेरुळ, जैन स्मारके एलोरा लेणी नाशिक जिल्ह्यातील विघ्नेश्वर मंदिर ओझर, संत निवृत्तीनाथ समाधी त्रिंबकेश्वर जवळ, त्रिंबकेश्वर शिव मंदिर, मुक्तीधाम , सप्तश्रृंगी मंदिर वणी, काळाराम मंदिर, जैन मंदिरे, मांगी-तुंगी, गजपंथ अहमदनगर जिल्ह्यातील संत साईबाबा मंदिर शिर्डी, सिध्दीविनायक मंदिर सिध्दटेक, शनि मंदिर शनि शिंगणापूर, श्री क्षेत्र भगवानगड पाथर्डी रायगड जिल्ह्यातील बल्लाळेश्वर पाली बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज शेगाव, पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी कार्ला सांगली जिल्ह्यातील श्री दत्त मंदिर औदुबंर बीड जिल्ह्यातील केदारेश्वर मंदिर, वैजनाथ मंदिर परळी, रत्नागिरी जिल्ह्यातील पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वर मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली देवी सातारा जिल्ह्यातील श्री काळेश्वरी मंदीर ऊर्फ काळूबाई मंदिर नागपूर जिल्ह्यातील अष्टदशभुज (रामटेक), दिक्षाभूमी यवतमाळ जिल्ह्यातील चिंतामणी कळंब इत्यादी तीर्थक्षेत्राचा समावेश आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या