🌟पुर्णा नगरीतील जनसामान्यांच्या सुख दुःखात धावून येणारे सामाजिक/राजकीय क्षेत्रातील निर्मळ मनाने व्यक्तीमत्व....!


🌟पुर्णा नगर परिषदेचे माजी नगर सेवक देवेंद्र भैय्या राठोड यांची नगर परिषदेतील कारकीर्द अविस्मरणीय🌟 

पुर्णा नगरीतील पुर्णा नगर परिषदेत अत्यंत कर्तव्यदक्ष इमानदार अधिकारी म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली असे नगर परिषदेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक सन्माननीय भरतलालजी राठोड साहेब यांच्या संस्कारांची छाप ज्यांच्यावर पडली असे त्यांचे सुपुत्र तथा पुर्णेतील सामाजिक/राजकीय क्षेत्रातील निर्मळ मनाचे व्यक्तीमत्व माजी नगरसेवक देवेंद्र भैय्या राठोड यांनी पुर्णा नगर परिषदेची निवडणूक सन २००६ यावर्षी शिवसेना पक्षाकडून लढवली व ते बहुमताने निवडून आले सन २००६ ते २०११ या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे केली.


देवेंद्र भैय्या राठोड यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकीर्दीत आपल्या प्रभागातीलच नव्हे तर त्यांच्याकडे सहकार्याची अपेक्षा ठेवून जाणाऱ्या प्रत्येकाला निस्वार्थपणे सहकार्य केले कधीही कोणाशी भेदभाव न बाळगता प्रत्येकाच्या अडीअडचणी दुर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्यामुळे त्यांची पुर्णा नगर परिषदेतील कारकीर्द अविस्मरणीय म्हणावी लागेल आपल्या कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर त्यांनी छाप पाडली असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही राजकीय/सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ निर्मळ मनाचे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे बघीतले जाते.

असे निर्मळ मनाचे व्यक्तीमत्व आमचे भैय्या देवेंद्र राठोड यांचा आज सोमवार दि.१५ जुलै २०२४ रोजी ४८ वा अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस असल्याने त्यांना आमच्या जंग-ए-अजित न्यूज वेबवृत्तवाहीनी कडून तसेच शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशनकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या