🌟 गंगाखेड विधानसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकारी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिराचे ३१ जुलै रोजी आयोजन.....!



🌟या प्रशिक्षण शिबिरास मनसे नेते गणेश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती राहणार🌟

गंगाखेड : - गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील 'गंगाखेड-पालम-पुर्णा' या तीनही तालुक्यांमधील सर्व पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्यासह इच्छुक उमेदवार यांच्याशी संवाद साधण्यासाठी तसेच निवडणूक पुर्व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवार दि.३१ जुलै २०२४ रोजी गंगाखेड शहरातील अय्या कॉम्प्लेक्स सुमन फंक्शन हॉल डॉक्टर लेन आयसीआयसीआय बँके समोर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण शिबिरास मनसे नेते गणेश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या बैठकीस दिलीप बापू धोत्रे मनसे नेते, रुपेश देशमुख जिल्हाध्यक्ष, यादव महात्मे जिल्हा उपाध्यक्ष, राहुल डोंगरे तालुकाध्यक्ष गंगाखेड, अनिल बुचाले पूर्णा, आकाश जामगे शहराध्यक्ष, गजानन भुसनर तालुका संघटक, राज ठाक्कर शहराध्यक्ष पूर्ण, साई टाक, माधव भिसे, दत्ता कुदमुळे, विलास जाधव, बंडू स्वामी व गंगाखेड पालम पूर्ण तिने तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते या या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहणार असून या प्रशिक्षण शिबिरात मान्यवर मोलाचे मार्गदर्शन करणार आहे उपस्थित राहण्याचे आवाहन गंगाखेड तालुका अध्यक्ष राहुल डोंगरे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या