🌟जोगलदरी येथील 'कामधेनु'गोरक्षण व अनुसंधान केंद्र येथे आरओची 'अर्हम जल मंदिर'पानपोईचे उद्घाटन.....!


🌟भुकेल्याला अन्न आणी तहानलेल्यांना पाणी'उपलब्ध करुन देणे मोठे पुण्याचे काम🌟

फुलचंद भगत

वाशिम:-वाटसरुंना शुध्द आणी थंड पाणी पिण्यासाठी ऊपलब्ध व्हावे हा ऊदात्त हेतु समोर ठेवुन मंगरूळपीर तालुक्यातील 'कामधेनु'गोरक्षन व अनुसंधान केंद्राच्या वाटेवर आरओची 'अर्हम जल मंदिर' ऊद्घाटन करुन लोकहिताचे ऊत्तम ऊदाहरण निर्माण केले आहे.

          'भुकेल्याला अन्न आणी तहानलेल्यांना पाणी'उपलब्ध करुन देणे मोठे पुण्याचे काम आहे.मंगरुळपीर ते मानोरा हायवेवरुन दररोज हजारो वाहने आणी वाटसरु प्रवास करतात.यामध्ये वृध्द,बालके,महिलाही असतात.मध्ये तहान लागल्यास पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे वाटसरुंचे घसे कोरडेच राहत होते.ही वाटसरुंची व्यथा लक्षात घेवुन राष्टसंत परम गुरुदेव श्री.नम्रमुनी महाराज साहेब प्रेरीत असलेल्या 'अर्हम सेवा गृप'व्दारा 'अर्हम जल मंदीर'ऊभारुन तहानलेल्यांना शुध्द आणी थंड आरओची पाणी ऊपलब्ध करुन देण्यात आले आहे.असे आरओचे शुध्द पाण्याची पानपोई महाराष्टातील एकमेव पानपोई आहे.या पानपोईच्या ऊद्घाटनप्रसंगी मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी चरणसिंग राठोड,ग्रा.पं.सदस्य ओंकार चव्हाण,गणेश चव्हाण,रामचंद्र राठोड,कैलास अखड,चंद्रशेखर राठोड,माणिक चव्हाण,अनिल महाराज चव्हाण,ऊत्तमराव इंगोले,श्याम अवताडे,बबन राठोड,ललित चव्हाण तसेच पाणी फाउंडेशन चे गवई व कामधेनू गोरक्षण अनुसंधान केंद्राचे सर्व संचालक मंडळ व संपुर्ण अवताडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या